माहितीचा अधिकार कायदा २००५ हा सर्वसामान्य जनतेला सहज माहित उपलब्ध व्हावी व न्याय मिळावा, प्रशासनात पारदर्शदक पणे कामे व्हावीत. तसेच देशातील व राज्यातील भ्रस्टाचार कमी व्हावा या साठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. माहिती अधिकार कायद्याची संपूर्ण राज्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच काही प्रमुख मागण्या आहेत त्या शाशनाने पूर्ण कराव्यात या साठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन व उपोषण आंदोलन दिनांक १ मार्च २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून आझाद मैदान मुंबई येथे होणार आहे.
धरणे आंदोलन व उपोषणातील प्रमुख मागण्या
१) माहिती आयुक्तांच्या रिक्त जागा त्वरित भरा.
२) आयुक्ताची निवड पत्रकार, शास्त्रज्ञ, निवृत्त न्यायाधीश, व समाजसेवक यांच्यातून करण्यात यावी.
३) माहिती अधिकारांचा सामान्य जनतेमध्ये प्रसार व प्रचार व्हावा यासाठी वार्षिक १०० कोटींची अर्थसंकल्पीयत रतूद करा.
४) जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांना प्रशिक्षण सक्तीचे करा.
५) प्रत्येक सरकारी कार्यालयात कलाम -४ची काटेकोर अंमलबजावणी करा. ६) माहिती अधिकार कायद्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा.
या प्रमुख मागण्यांसह माहिती अधिकार कायद्याची संपूर्ण राज्यात कठोर अंमलबजावणी व्हावी या साठी १ मार्च २०२३ रोजी मुंबई येथील आझाद मैदानात सकाळी १०.०० वाजेपासून धरणे व उपोषण आंदोलन होणार आहे तरी या साठी संपूर्ण महाराष्ट्रातून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माहिती अधिकार क्षेत्रात काम करणारे इतर समविचारी संस्था संघटनेचे कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यानी हिया आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य मुजम्मील ए. हुसैन सरयांनी केले आहे.
मुजम्मील ए. हुसैन सर
राज्य कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य - माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ मो.न- 9763127223
0 Comments