अक्कलकुवा / बुलेटिन...
भारत सरकारच्या G 20 प्रेसिडेन्सी वसुधैव कुटुंबकम् One Earth,one family,one future च्या अंतर्गत जामिया औद्योगिक प्रशिक्षण संस्था अक्कलकुवा येथे 15 आणि 16 फेब्रुवारी 2023 या दोन दिवसांसाठी क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या क्रीडा स्पर्धेत सर्व व्यवसायातील विद्यार्थ्यांनी विविध खेळांसाठी आप आपल्या निर्देशकांच्या नेतृत्वाखाली संघ तयार केले. ज्या मध्ये अनुक्रमे क्रिकेट आणि कबड्डी हे दोन खेळ खेळविले गेले. ज्याचे उदघाटन 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता जामीया क्रीडांगणत जामिया आय. टी.आय चे प्राचार्य अकबर पटेल यांच्या हस्ते सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
दोन दिवसाच्या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारीला, इलेक्ट्रिशियन आणि R.A.C संघाचे दोन संघ क्रिकेटच्या सर्व फेरीत चमकदार कामगिरीमुळे अंतिम सामना खेळण्यासाठी दावेदार बनले". शेवटी फाइनल इलेक्ट्रिशियन संघाने आर.ए.सी संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. कबड्डीच्या स्पर्धेत ही ह्याच व्यवसायाच्या (इलेक्ट्रिशियन ) विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीत बाजी मारली.
खेळाच्या समारोप प्रसंगी दोन्ही स्पर्धेतील विजेत्या संघाला जामिया संस्थेचे अध्यक्ष मौलाना गुलाम वस्तानवी साहेब , उपाध्यक्ष मौलाना हुझैफा वस्तानवी साहेब व संस्थेचे डायरेक्टर मौलाना ओवेस वस्तानवी साहेब ह्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले व त्यांना पुरस्कृत करून गौरविण्यात आले.ह्या प्रसंगी आय. टी. आय चे प्राचार्य, अकबर पटेल व उप प्राचार्य इलयास पटेल तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या शेवटी रईस सरांनी विजेत्या संघाचे आणि त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन केले. व सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शेख आकिब सर, शोएब सर, शफीक सर, योगेश पाटील सर, गिरासे सर, इब्राहिम पटेल सर, इत्यादी. सर्वांनी परिश्रम घेतले.
0 Comments