धुळे प्रतिनिधी प्रकाश नाईक
उडाणे, धुळे :- दि.25 जानेवारी 2025 रोजी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ग्रामीण श्रमसंस्कार शिबिर प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. सुदाम जी.राठोड यांनी वरील मत व्यक्त केले. ते पुढे बोलताना असे म्हणाले की, समाजातील सर्व घटकांचा सर्व अर्थाने सहभाग, विकास आणि व्यापक कल्याण या बाबी साध्य करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. यासाठी सर्व समावेशित धोरण व व त्याची तंतोतंत अंमलबजावणी हे विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे अशी आग्रही मांडणी त्यांनी केली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत गवते यांनी राष्ट्रीय जीवन उन्नती अभियान व त्याची कार्यपद्धती आणि देशासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध ग्रामीण विकासाच्या योजना याविषयी उपस्थित राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना सविस्तर मार्गदर्शन केले
0 Comments