Header Ads Widget


जामिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा


अक्कलकुवा प्रतिनिधी प्रकाश नाईक

अक्कलकुवा :-  दि. 25 जानेवारी 2025  शनिवार रोजी अक्कलकुवा जामिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयात 15 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जामिया विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सऊद हे उपस्थित होते. डॉ. सऊद यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे किती महत्त्वाचे आहे ते सांगितले. या देशातील प्रत्येक मतदाराने आपले कर्तव्ये ओळखले पाहिजे. मतदान करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे या अधिकाराचा उपयोग प्रत्येक मतदाराने लोकतंत्र अधिक मजबूत करण्यासाठी केला पाहिजे.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य साजीद पिंजारी यांनी बी. एड. च्या विद्यार्थी आणि शिक्षकांना राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्ताने लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आव्हान केले. जेणेकरून मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल. यासाठी वेगवेगळ्या पातळीवरुन मतदारांमध्ये जाणीवजागृती केली जात आहे. 

प्रा. मोहसीन पठाण यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्ताने अनेक मुद्यांवर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा शेवट मतदान प्रतिज्ञा वाचन करून करण्यात आला. या कार्यक्रमास प्रा. आशिष वसावे, प्रा. सरिता पाडवी, प्रा. तौसिफ अन्सारी प्रा. अमजद कमाल, प्रा. मोहम्मद फैज, प्रा. इम्रान  साकीर व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

Today is Friday, April 11. | 1:18:26 AM