Header Ads Widget


माणूस घडवण्याचे व्यासपीठ श्रमसंस्कार शिबिर ! प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ


धुळे प्रतिनिधी प्रकाश नाईक 
उडाणे, धुळे :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष ग्रामीण श्रमसंस्कार शिबिरामध्ये ( दि २२ ते २८ जानेवारी २०२५)वरील मत व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सात दिवसाच्या या शिबिरा मधून स्वतःचे व्यक्तिमत्व विकास करून घेणे ही मोठी संधी असते यासाठी सर्व उपक्रमामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. शिबिराच्या प्रास्ताविकातून  रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राहुल आहेर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या या वर्षीच्या 'युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी' या विशेष थीमचे विश्लेषण केले व सात दिवसांमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.पश्चिम विभागीय रासेयो समन्वयक प्रा. डॉ. हेमंत जोशी यांनी श्रम संस्कार शिबिराची चौकट उपस्थित सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंम सेवकांना सविस्तर विशद करून दिली.तसेच या ग्रामीण श्रमसंस्कार शिबिरा मधून विद्यार्थ्यांनी अनेक कला कौशल्य विकसित करून घेतले पाहिजे अशी आग्रही मांडणी केली. उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी धुळे पंचायत समितीचे माजी सभापती विजय पाटील यांनी गावामध्ये श्रमदान करण्यासंदर्भात विशेष मार्गदर्शन केले व उपस्थितांना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी ग्रामीण श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटक सैनिक पत्नी लिलाबाई मोरे, उडाने गावच्या

प्रथम नागरिक सरपंच नबाबाई रामदास पवार, कामगार कल्याण अधिकारी तथा माजी विद्यार्थी नवल भाऊ पाटील, सैनिक मित्र कल्पेश शिंदे, जिल्हा परिषद उडाणे शाळेचे मुख्याध्यापक योगेंद्र झाल्टे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. 

उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. फरीदा खान यांनी सूत्रबद्ध पद्धतीने केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

Today is Monday, April 14. | 9:37:3 PM