प्रतिनिधी : मंडळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्याच्या घोषणेला दुजोरा दिला आहे. शिर्डी येथे आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकारच्या या योजनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. मंत्री म्हणाले, युती सरकार आपल्या लाडक्या बहिणींना कधीच अडचणीत आणणार नाही. त्यांच्या खात्यात बजेट मंजुरीनंतर २१०० रुपये जमा होतील.
मानधन १५०० वरून २१०० रुपये होणार
विखे पाटील पुढे म्हणाले, विरोधी पक्ष आरोप करत होते की निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होईल. आम्ही ही योजना अखंड सुरू ठेवली आहे आणि पुढील हप्ता मिळण्याबाबत खात्री बाळगा. आता बजेट मंजूर झाल्यावर फेब्रुवारी महिन्यापासून महिलांना १५०० रुपये ऐवजी २१०० रुपये मानधन मिळेल.
अपात्र महिलांच्या लाभांबाबत निर्णय
सरकारने या योजनेच्या पार्श्वभूमीवर अपात्र महिलांना योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. बेकायदेशीरपणे लाभ घेतलेल्या महिलांकडून पैसे परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी सरकारने सांगितले होते की अपात्र महिलांकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत, मात्र याबाबत आता नवीन दिशा-निर्देश जारी करण्यात आले आहेत.
मार्चपासून वाढीव हप्ता लागू
पूर्वीच्या सरकारने निवडणुकीच्या काळात १५०० रुपयांचे मानधन २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. दोन महिन्यांनंतरही अंमलबजावणी झालेली नव्हती. या संदर्भात महिलांनी सरकारकडे तक्रारी केल्या होत्या. आता बजेटनंतर, मार्च महिन्यात महिलांच्या खात्यात २१०० रुपयांचा हप्ता जमा होईल.
लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक स्थिरता देण्यासाठी सुरू करण्यात आलेली असून, सरकारने योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.
0 Comments