Header Ads Widget


मौखिक आरोग्य काळाची गरज!डॉ. सुदाम राठोड..


धुळे प्रतिनिधी प्रकाश नाईक 

उडाणे, धुळे दि. 27 जानेवारी 2025 रोजी समता शिक्षण संस्था पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित श्रमसंस्कार शिबिरात वरील मत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सुदाम राठोड यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी  समाजकार्य प्रशिक्षणार्थ्यां नी समाजातील गरीब तसेच व्यसनाधीन गटाला व संपूर्ण समाजाला मौखिक आरोग्याच्या संदर्भात सल्लामसलत करणे, मार्गदर्शन करणे ही काळाची गरज आहे अशी  आग्रही मांडणी केली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राहुल आहेर यांनी उपस्थित स्वयंसेवकांनी समाजातील तळागाळातील घटकांना, निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना मौखिक स्वच्छतेच्या संदर्भात मार्गदर्शन करावे असे आग्रही प्रतिपादन केले. तसेच महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. फरिदा खान यांनी महिलांमधील वाढते मिसरीचे प्रमाण रोखण्यासाठी स्वयंसेवकांनी विशेष कार्य करावे असे आवाहन केले. सदरील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. व्यंकटेश कराडे, डॉ .धनश्री कुटे, डॉ. वैशाली मालजापुरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व प्रशिक्षणार्थ्यांना दाताची निगा राखण्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डॉ. योगेंद्र झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली  उडाणे जिल्हा परिषद शाळेतील १५७ विद्यार्थ्यांची दाताची तपासणी करण्यात आली. सदरील दंतरोग शिबिर प्राचार्य डॉ. अरुण डोडामणी, डॉ. प्रशांत यांच्या मार्गदर्शनाखाली उडाणे गावात संपन्न झाले.


Post a Comment

0 Comments

Today is Saturday, April 5. | 7:29:6 PM