अक्कलकुवा प्रतिनिधी प्रकाश नाईक
अक्कलकुवा :- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या क्षेत्रिय कार्यालयात अनुसूचित जमातीची गट-अ ते गट-ड संवर्गातील १ हजार ५४१ पदे रिक्त आहे.ही पदे विशेष पदभरती मोहीम राबवून भरण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग (१६-ब ) उपसचिव यांना निवेदन पाठवून ट्रायबल फोरमचे जिल्हाध्यक्ष नितीन तडवी यांनी केली आहे.
सार्वजनिक विभागात एकूण मंजूर पदे ४८ हजार १६८ आहे. त्यापैकी ३ हजार ८८० पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.राखीव पदापैकी अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या केवळ २ हजार ६२१ आहे. त्यापैकी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले २ हजार ३२८ आहे.
अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी , कर्मचाऱ्यांची संख्या २८२ आहे.तर अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या २३५ आहे. तब्बल ४७ पदे गायब करण्यात आली आहे. अनुसूचित जमातींचा १ हजार २५९ पदांचा अनुशेष शिल्लक आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाची आणि शासन निर्णय दि.२१ डिसेंबर २०१९ ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आदिवासी समाज बांधवांचा आरोप आहे.
अनुसूचित जमाती पदभरती तपशील
संवर्ग/एकूण मंजूर पदे/राखीव पदे/भरलेली पदे/अधिसंख्य पदे
गट अ /९२८६/६४९ / ५११ /१० गट ब/२२३३ / १५६ /२९ २ गट क २७१९७/२१८९/१४५७/१६५
गट ड /९४५२ / ८८६ / ६२४ /१०५, ४८१६८/ ३८८०/२६२१/२८२
" राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात आदिवासी समाजाचा पुर्वीचा अनुशेष १ हजार २५९ पदांचा शिल्लक आहे. आणि अधिसंख्य केलेली २८२ पदे अशी एकूण १ हजार ५४१ पदे रिक्त आहे.अनुसूचित जमाती उमेदवारांची विशेष पदभरती मोहीम राबवून बेरोजगार आदिवासी उमेदवारांना न्याय देण्याची मागणी केलेली आहे. नितीन तडवी जिल्हाध्यक्ष, ट्रायबल फोरम नंदुरबार
0 Comments