Header Ads Widget


टाटा समाज विज्ञान संस्थेचे संचालकांची महाविद्यालयास भेट

मोराणे प्रतिनिधी प्रकाश नाईक 
मोराणे, धुळे:- दि.31 जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे या महाविद्यालयास टाटा समाज विज्ञान संस्थेचे संचालक  प्रोफेसर डॉ. रमेश जारे यांची विशेष भेट संपन्न झाली . याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ व प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी संचालक प्रोफेसर डॉ. रमेश जारे यांचे स्वागत केले. तसेच त्यांनी महाविद्यालयातील विविध प्रकल्पांची महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ  यांच्याकडून महाविद्यालयाची व विविध प्रकल्पांची  विशेष माहिती करून घेतली.  ज्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध कोर्सेस तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी प्रकल्पास भेट व माहिती जाणून घेतली. 

यामध्ये सुभाष बागुल यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली, ग्रंथपाल प्रा. गजेंद्र जगदेव यांनी प्रबोधन पर्व देऊन संचालक प्रोफेसर डॉ. रमेश जारे यांचे स्वागत केले व ग्रंथालया मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाचा परिसर व महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती घेतल्यानंतर संचालकांनी महाविद्यालयाचे विशेष कौतुक केले. यामध्ये समाजकार्य प्रशिक्षणार्थ्यां च्या उज्वल यशासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पामुळे निश्चितच या परिसरातील वंचित घटकांसाठी व्यावसायिक समाज कार्याचे प्रशिक्षण घेऊन अधिकारी कर्मचारी होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जात असल्याबाबत  महत्त्वाची भूमिका महाविद्यालय पार पाडत आहे. 

महाविद्यालयातून शिक्षण- प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग, कायद्यांच्या पुनर्वसनात कार्य करणारे अधिकारी, उपायुक्त आदिवासी कल्याण विभाग, महाविद्यालयामध्ये वरिष्ठ प्राध्यापक, समुपदेशक, आरोग्य अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, आश्रम शाळा अधीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यां बाबत समाधान व्यक्त केले तसेच या कामी संस्थेचे संस्थापक सचिव प्रा. विलास वाघ यांच्या विशेष स्वप्नपूर्ती संदर्भात व संस्थेमार्फत महाविद्यालय आणि आश्रम  शाळा परिसरात पवन ऊर्जा, सौर ऊर्जा प्रकल्प राबवत असल्याबाबत कौतुक केले आणि संस्थे व महाविद्यालयास भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments

Today is Sunday, April 6. | 12:00:26 PM