Header Ads Widget


दिव्यांगाची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.


कार्यकारी संचालक : जुनैद अहमद
 

शहादा येथे दिव्यांगांची एकदिवसीय बचतगट कार्यशाळा , विविध योजनांचे मार्गदर्शन व अंत्योदय रेशनकार्ड वितरीत कार्यक्रम संपन्न झाला.

राष्ट्रीय अपंग विकास महासंघ , महाराष्ट्र राज्य, या संघटनेच्या वतीने लाखो दिव्यांगांना न्याय , हक्कांसाठी व अन्यायाविरुद्ध लढा देणारी महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यरत एकमेव संघटन आहे !

नंदुरबार जिल्हा शाखेच्या वतीने *दिनांक 12/02/2025 ला, बुधवारी , ठिक 12-00 वाजता,नगरपालिकेचे लोकमान्य टिळक टाऊन हॉल , जुना प्रकाशा रोड, - शहादा येथे दिव्यांग बचत गट एकदिवसीय कार्यशाळा,

विविध प्रकारच्या योजनांचे मार्गदर्शन व डिजीटल अंत्योदय रेशनकार्ड वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक -  मा. श्री कृष्णकांत कनवारीया सो.  - प्रांताधिकारी शहादा , कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव मोरे - राज्य उपाध्यक्ष हे होते , प्रमुख अतिथी मा. श्री दिपकजी गिरासे सो. - तहसीलदार शहादा , मा. श्री प्रभाकर सोनार  - नगरपालिका दिव्यांग विभाग प्रमुख, मा. श्री दिपक गोसावी सो.  उमेद,  बचत गट अधिकारी , सौ. अंजना मगरे मॅडम - बचतगट प्रमुख. अशा मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला .

कृष्णकांत कनवारीया यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माझ्या स्तरावर असलेल्या दिव्यांगांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मी आपल्या सोबत आहे, शहादा तालुका परिसरातील बऱ्याच शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये रॅम्प नाहीत व रोजगाराच्या योजना राबविण्यात अधिकारी उदासिनता दाखवत असल्याचे ह्या समस्या श्री शिवाजीराव मोरे यांनी माझ्या समोर मांडल्या होत्या म्हणून मी जिल्हाधिकारी मॅडमांसमोर मांडल्या होत्या त्या सोडविण्यासाठी आपल्या सोबत असल्याचे सांगितले आहे.

आजचा कार्यक्रम फार सुंदर केला आहे, अशा प्रकारच्या कार्यक्रमात मी पहिल्यांदा सहभागी झालो व या विषयावर मला माहिती घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

तसेच मा. श्री दिपकजी गिरासे तहसीलदार यांनी आपले मनोगतात सांगितले की, आमच्याकडील सर्व योजनांचे लाभ देण्यात येत आहेत, त्यात संजय गांधी अनुदान व अंत्योदय योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करणेत येत आहेत, जर कोणाच्या काही अडचणी असतील तर आपण कधीही मला भेटा त्या त्वरीत सोडविण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे, मोरे साहेबांना आमच्या शासकीय कार्यक्रमांमध्ये वेळोवेळी सहभागी करून घेण्यात येते, त्यांचे दिव्यांग क्षेत्रात विशेष कार्य आहे, म्हणून आम्ही त्यांचा निश्चितच आदर व संन्मान करतो.


श्री शिवाजीराव मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, माझ्या दिव्यांग बांधवांसाठी व भगीनींसाठी गेल्या 39 वर्षांपासून त्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढा उभारला आहे, त्यामुळेच अपंगांचा विकासाचा कृतीआराखडा मंजूर करून घेणे, अशा विविध योजनांचे निर्णय घेण्यास शासनास भाग पाडले आहे, म्हणून आज खऱ्या अर्थाने राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या माध्यमातून अंत्योदय रेशनकार्ड, बिजभांडवल योजना , घरकुल, 5 टक्के निधी वाटपाचे नियोजन करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत, नौकरीतील आरक्षण, व्यावसायिक तयार करण्यासाठी आम्ही पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा केलेल्या लढ्यातून काही प्रमाणात योजना मिळून देण्यात यशस्वी झालेलो आहोत, हे मिळून घेण्यासाठी काही वेळा शासनाच्या विरोधात मुंबई हायकार्टाचेही दार ठोठावे लागले आहे, काही अधिकारींच्या नाकर्तेपणामुळे दिव्यांग बांधवांना व भगीनींना योजनांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असे अथक परिश्रमे व अडचणींना तोंड द्यावे लागते आहे अशी हळहळ व्यक्त केली. व श्री दिपक गोसावी बचतगट अधिकारी यांनी सांगितले दिव्यांग बांधवांनी व भगीनींनी उमेदच्या माध्यमातून स्थापन केलेल्या बचतगटांच्या माध्यमातून आपला आर्थिक विकास घडवून घेऊ शकतात, बचतगट ही संकल्पना फार मोठी आहे,  गोसावी यांनी बचतगटांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

दिव्यांग विभागाचे प्रमुख श्री प्रभाकर सोनार यांनी सांगितले की मोरे साहेबांनी सहकार्य केले आहे, म्हणून दर वर्षी 5 टक्के निधी वाटप  करण्यात येते, याही वर्षी 22 लाखांचे वाटपाचे नियोजन करण्यात येते आहे, नगरपालिकेच्या माध्यमातून 25 दिव्यांग बचतगट तयार केले आहेत, म्हणून दिव्यांगा बांधवांनी व भगीनींनी नगरपालिकेच्या विविध योजनांचे लाभ घ्यावेत.

नगरपालिकेचा लोकमान्य टिळक टाऊन हॉल विनामूल्य उपलब्ध करून दिल्या बद्दल मा. साजिद पिंजारी सो. मुख्याधिकारींचे श्री शिवाजीराव मोरे यांनी आभार मानलेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व भगीनी उपस्थित होते. तसेच या वेळी महासंघाची बैठक घेण्यात आली,  महासंघा सोबत काम करण्याची ईच्छा दिव्यांग बांधवांसाठी प्रमाणिकपणे व मनापासून कार्य करणारे *नंदुरबार जिल्हा शाखा - जिल्हा अध्यक्ष पदी* श्री राजाभाऊ कुवर यांची नियुक्ती श्री शिवाजीराव मोरे, राज्य उपाध्यक्ष, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र राज्य यांनी केली.

तसेच जिल्हा व तालुकास्तरावर काही पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या दिव्यांग बांधवांसाठी व भगीनींसाठी नवीन जोमाने कामाला सुरुवात करु असे आश्वासन देणारे व जबाबदारी स्वीकारणारे नवीन खालील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही मोरे यांनी केल्यात, त्यात श्री प्रदीप बागुल - जिल्हा समन्वयक,श्री जयपाल परदेशी - जिल्हा सरचिटणीस. श्री ईश्वर रोकडे - जिल्हा डायरेक्टर, श्री रविंद्र लोटन पाटील- उपाध्यक्ष, शहादा तालुका, श्री माणक विठ्ठल पाटील- ता. डायरेक्टर, शहादा तालुका, श्री रामेश्वर दशरथ पवार- सरचिटणीस, शहादा तालुका, सौ. पुष्पाबाई माधव पाटील- महिला अध्यक्षा , शहादा तालुका. सौ. मिराबाई सतीश गावित- महिला अध्यक्षा , नवापूर तालुका,सौ. अर्चना महेंद्र पाटील- महिला उपाध्यक्षा, शहादा तालुका,सौ. मुक्ताबाई भगवान पाटील- महिला सरचिटणीस, शहादा तालुका, सौ. वैशाली सोमनाथ पाटील- महिला डायरेक्टर, शहादा तालुका.असे नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री राजाभाऊ कुवर, श्री गुलाब गावित, सौ. सुनिताताई कुवर, श्री मासुम मणियार , श्री अरविंद शिंदे, श्री धरमसिंग पावरा, श्री महेंद्र पाटील, श्री दिनकर पाडवी, श्री चंद्रकांत पाटील, सौ. चैताली लोहार, श्री सलिम शेख, श्री दुर्गादास लोहार , श्री दिनकर वसावे, श्री मधू नाईक , सुधाम लोहार, श्री गणेश पावरा यांनी परिश्रम घेतले , व प्रदीप बागुल यांनी सुत्रसंचलन केले, आणि श्री राजाभाऊ कुवर यांनी आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

0 Comments

Today is Monday, April 7. | 4:56:38 AM