प्रतिनिधी : अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नवनियुक्त पोलीस निरीक्षक यांनी अश्लील भाषा वापरल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन त्यांना त्वरित निलंबित करावे या मागणीसाठी संध्याकाळी पोलीस ठाण्यासमोर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनात आमदार आमश्या पाडवी नागेश पाडवी हिरामण पाडवी किसन महाराज आदिवासी महासंघाचे जेडी पाडवी पंचायत समिती सदस्य जेकमसिंग पाडवी सरपंच वसंत वसावे विनोद वळवी कुवरसिंग वळवी भूपेंद्र पाडवी अँड .रुपसिंग वसावे, मंगलसिंग वळवी पृथ्वीसिंग पाडवी यांच्यासह कार्यकर्ते तसेच पीडित मुलीचे नातेवाईक सहभागी झाले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अक्कलकुवा तालुक्यातील एका गावातील तरुणीला दिनांक 14 फेब्रुवारी रोजी विशिष्ट समाजातील तरुणाने पळवून नेले होते याबाबत तरुणीच्या कुटुंबीयांनी मुलीला खुश लावणी पडविल्याच्या आरोप केला होता मात्र अक्कलकुवा पोलिसांनी हरविल्याची नोंद केली होती या तरुणीच्या पोलिसांनी तात्काळ शोध लावून सुपूर्त करावे अशी मागणी केली होती याबाबत रास्ता रोको आंदोलनाच्या इशारा देण्यात आला होता पोलिसांनी तपासाची गती वाढवून मुलीच्या तपास लावून आज दिनांक रोजी नंदुरबार येथे मुलीच्या कुटुंबीयांना सुपूर्त करण्यासाठी बोलाविण्यात आले होते मात्र मुलीचे कुटुंबीय तसेच गावचे सरपंच व प्रतिष्ठितांनी मुलीला अक्कलकुवा येथील पोलीस ठाण्यामार्फत पालकांना का सुपूर्त करत नाहीत अशा प्रश्न उपस्थित केला यावेळी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नवीनच पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी अश्लील शब्द वापरला याबाबत निषेध व्यक्त करीत या अशभ्य पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात येऊन त्याला निलंबित करावे या मागणीसाठी शेवाळी नियंत्रण महामार्गावर संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तुम्हारे अडीच तास चाललेल्या या रास्ता रोको नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याबाबत मी वरिष्ठांना अहवाल सादर करून वरिष्ठ योग्य ती कारवाई करतील व यापुढे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकाला चांगली वागणूक दिली जाईल असे आश्वासन दिल्याने रात्री आठ वाजेला आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी आमदार आमश्या पाडवी आदिवासी एकता परिषदेचे नागेश पाडवी आदिवासी महासंघाचे किसन महाराज ,हिरामण पाडवी, जे डी पाडवी पंचायत समिती सदस्य जेकमसिंग पाडवी सरपंच वसंत वसावे ,कान्हा नाईक ,विनोद वळवी, कुवरसिंग वळवी, भूपेंद्र पाडवी , मंगलसिंग वळवी, पृथ्वीसिंग पाडवी ,केतन पाडवी, राजेंद्र वसावे, सुनील राव ,अश्विन तडवी ,विकेश पाडवी, राजू तडवी ,नटवर पाडवी, अँड .रुपसिंग वसावे आदिंसह विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ तसेच पीडित मुलीचे कुटुंबीय उपस्थित होते.
रास्ता रोको आंदोलन स्थगित झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दाखल झाले त्यांनी पोलीस निरीक्षकांच्या दालनात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली ते नेमकी काय कारवाई करतात याकडे आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले होते.
पोलीस अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात येणाऱ्यांशी अश्लील भाषा वापरणे कायद्याच्या चौकटीत न बसणारे असून या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई न झाल्यास उद्या पासून होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कठोर कारवाई करून त्वरित निलंबन करण्यात यावे अशी मागणी करणार असल्याचे आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक बुधवंत यांनी त्यांच्या दालनात पीडित मुलींचे आई-वडील सह सरपंच अशा चारच लोकांनी यावे अशी तंबी दिली दिवसभरापासून तात्काळत असलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तसेच सरपंच व प्रतिष्ठितांनी मुलीला नंदुरबार येथें सुपूर्त करता अक्कलकुवा येथेच सोयीच्या ठिकाणी सुपूर्त करण्याची मागणी केल्याने या पोलिस अधिकाऱ्याने अश्लील शब्द वापरल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत हे शहादा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना वादग्रस्त ठरले होते तेथून त्यांची तडकाफडकी उचल बांगडी करण्यात येऊन नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले होते अक्कलकुवा येथे पदभार स्वीकारताच हा वाद निर्माण झाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा वादग्रस्त अधिकाऱ्याला संवेदनशील पोलीस ठाण्यात नियुक्त करण्याच्या पुनर्विचार करणे क्रमप्राप्त ठरते.
0 Comments