Header Ads Widget


सैनिकी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे जिल्हा सैनिक अधिकारी धुळे संजय गायकवाड यांचे आवाहन


नंदुरबार,दि.27फेब्रुवारी,2023(जिमाकावृत्तसेवा):धुळे शहरात मध्यवर्ती बसस्थाकालगत असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह,धुळे येथे प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली आहे, असे जिल्हा सैनिक अधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

या वसतिगृहात आजी-माजी सैनिकांच्या आठवीपासून पुढील अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक शुल्क आकारुन प्रवेश दिला जातो. या वसतीगृहात निवास, भोजन, 24 तास पाण्याची व्यवस्था, वायफाय, जिम, पुस्तकालय व मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. वसतिगृहात कार्यरत कर्मचारी मुख्यत्वे सैनिकी सेवेतून सेवा निवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शिस्तीविषयी मार्गदर्शन केले जाते.
सन 2023-2024 मध्ये आठवी वा पुढील शिक्षण घेत असलेल्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिक, दिवंगत सैनिक, माजी सैनिकाच्या विधवा पत्नींनी त्यांच्या पाल्यांसाठी या वसतिगृहाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02562-237607,237264 भ्रमणध्वनी क्रमांक 9765333488/9270208408/7020264940 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी, संजय गायकवाड यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

|