Header Ads Widget


शेळी गट योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे नंदुरबार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे आवाहन

नंदुरबार,दि.27 फेब्रुवारी,2023 (जिमाकावृत्तसेवा): एकात्मिक आदिवासी विकास विभागातर्गत सन 2014-2015 या वर्षांतील विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत आदिवासी महिला बचत गटांना शेळी गट योजनेचा लाभ देण्यासाठी नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या महिला बचत गटाकडून 14 मार्च, 2023 पर्यत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे
शेळी गट व्यवसायासाठी लाभार्थी महिला बचत गट अनुसूचित जमातीचा असावा. बचत गट नोंदणीकृत असावा. महिला बचत गटातील एका सदस्याच्या नावे सातबारा उतारा असणे आवश्यक राहील. पिण्याचे पाणी उपलब्ध असल्याचे ग्रामसेवकाचा दाखला, यापुर्वी इतर शासकीय योजनामधुन लाभ न घेतल्याचे ग्रामपंचायतीचा ना-हरकत दाखला. ग्रामसभा ठराव, बचत गटाचे सदस्य यादी, बचत गटाचे खाते असलेल्या बॅक पासबुकाची प्रत, बचत गट सदस्य यादी प्रमाणे प्रत्येक सदस्याचे दोन पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, दारिद्र्य रेषेखालील उत्पन्नाचा दाखला,जातीचा दाखला, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला ( स्वघोषणापत्र ) तसेच शेळी गट तीन वर्षांपर्यंत विक्री करणार नसल्याचा दाखला. तसेच योजनेच्या ठिकाणी नामफलक लावणार असल्याचा दाखला, योजनेच्या अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा करारनामा अर्जा सोबत जोडणे आवश्यक असेल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमून्यातील अर्जाचे वाटप प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नवापूर रोड, नंदुरबार येथे 28 फेब्रुवारी, 2023 ते 14 मार्च, 2023 या कालावधीत (सुटीचे दिवस वगळून ) कार्यालयीन वेळेत वाटप केले व स्विकारले जातील, असे श्रीमती करनवाल यांनी नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments

|