Header Ads Widget


भारतात प्रतिबंधित असलेले ई सिगारेट जप्त, दोघांस अटक.


मुंबई शहर, दि. २७/०२/२०२३.

कक्ष-10 गुन्हे प्रकटीकरण शाखा, मुंबई येथील सपोनि श्री. धनराज चौधरी यांना दि. 24/02/2023 रोजी त्यांच्या गुप्त बातमीदाराने विश्वसनिय खबर दिली की, समराज गल्ली, विलेपार्ले पश्चिम, मुंबई येथे भारत सरकारने प्रतिबंधीत केलेली परदेशी बनावटीचे ‘‘ ई-सिगारेट ’’ अवैधरित्या जवळ बाळगलेला साठा बेकायदेशिरपणे वितरणासाठी वर नमुद ठिकाणी दोन इसम येणार आहेत. त्यावरून प्रपोनि दिपक सावंत यांनी सदर बातमीची खातरजमा करून सदरबाबत वरिष्ठांना अवगत करून पथक तयार करून नियोजनबध्द रित्या वर नमुद ठिकाणी सापळा लावला . सदर ठिकाणी वर नमुद दोन इसम आले असता बातमीदार यांनी त्यांचेकडे अंगुलीनिर्देशीत करून सदरचे दोन इसम हे तेच असल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांचेजवळ असलेल्या रेग्जिन बॅगची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यांचेकडे खालील प्रमाणे ई-सिगारेट मिळून आल्या PODSALT NEXUS 3500 Puffs E- Cigarrette वेगवेगळे फ्लेवर, 10 वेगवेगळे बॉक्स ऐका बॉक्स मध्ये 10 सिगरेट असलेले एकुण 100 ई सिगरेट किं.अं. रू. 1,00,000/- वर नमूद आरोपीतांस ताब्यात घेवून त्यांच्या जवळील उपरोक्त मुद्येमाल जप्त करून त्यांच्या विरूध्द जुहू पोलीस ठाणेस उपरोक्त प्रमाणे गुन्हा नोंद करून त्यांना जुहु पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची यशस्वी कामगिरी पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-1) गुन्हे शाखा, श्री.कृष्णकान्त उपाध्याय, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पश्चिम) श्री. दिपक निकम, यांचे मार्गदर्शनाखाली, व कक्ष-10 चे प्रभारी पोलीस निरीक्षक, श्री. दिपक सावंत यांच्या पर्यवेक्षणाखाली कक्ष -10, गुप्रशा, मरोळ मुंबई येथील सपोनि. श्री. धनराज चौधरी, आणि पोलीस अंमलदार पोहक्र 34166/धारगळकर, पोहक्र. 970533/धनवडे, पोहक्र.990135/मोरे, पोहक्र 030946/चिकणे, पोशिचाक्र 150929/चव्हाण यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments

|