Header Ads Widget


मुंबई शहरात बॉम्ब ची बोगस माहिती, पोलीस सतर्क.

 

मुंबई शहर, दि. २७/०२/२०२३.
दि.24/02/2023 रोजी दुपारी 13ः35 वा. चे दरम्यान दक्षिण नियंत्रण कक्ष येथील दुरध्वनी क्रमांक 022-23089855 यावर अज्ञात इसमाने फोन करून माहिती दिली की, बंदरगाह परिसर, मुंबई या ठिकाणी दि.23/02/2023 रोजी 90 किलो एम डी व स्फोटके उतरविण्यात आली आहेत व सदर स्फोटकांचा वापर जे.जे हॉस्पीटल, भेंडीबाजार व नळबाजार या परिसरात बॉम्ब स्फोट घडवुन आणण्याकरीता करण्यात येणार आहे अशी मोघम माहिती दिली. नमुद कॉलरला त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने नाव सांगण्यास नकार दिला. तसेच सदरबाबत अधिक अचुक माहिती विचारली असता, उडवाउडवीची उत्तरे देवुन फोन ठेवुन दिला.
सदरची माहिती प्राप्त होताच त्याबाबत प्रभारी पोलीस निरीक्षक दक्षिण नियंत्रण कक्ष, श्री अनुप डांगे तसेच अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, श्री. दिलीप सावंत यांना तात्काळ माहिती देण्यात आली. मुंबई शहर हे दहशतवादी हल्ल्याचे दृष्टीकोनातुन अतिरेकी संघटनांच्या केंद्र स्थानी असल्याकारणाने अपर पोलीस आयुक्त, यांनी सदर संवेदनशिल माहितीचे गांभीर्य लक्षात घेवुन दक्षिण विभागांतर्गत सर्व बंदर परिसर, लॅन्डींग पॉईटस, मर्मस्थळे, संवेदनशिल व गर्दीची ठिकाणे इत्यादी ठिकाणी सुरक्षा व सतर्कता पाळण्याचे आदेश दिले. तसेच सदर खळबळजनक माहिती सामन्य जनतेत पोहचल्यास अफवा पसरून त्यामुळे जनमाणसांत घबराहट निर्माण होवुन एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्यामुळे सदर माहितीची अत्यंत गोपनीयपणे शहानीशा करून पुढील योग्यती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
अपर पोलीस आयुक्त, यांच्या आदेशानुसार दक्षिण प्रादेशिक विभागांतर्गत सर्व बंदर परिसर, लॅन्डीग पॉईटस, मर्मस्थळे, संवेदनशिल व गर्दीची ठिकाणे इत्यादी ठिकाणी सदर माहितीच्या अनुषंगाने शोध घेतला असता, काहीही आक्षेपार्ह वस्तु आढळुन आल्या नाहीत व उपरोक्त नमुद कॉलरने खोटी माहिती दिली असल्याचे निष्पन्न झाले.
अपर पोलीस आयुक्त, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे.जे मार्ग पो. ठाणे श्री.सुभाष बोराटे, प्रभारी पोलीस निरीक्षक, दक्षिण नियंत्रण कक्ष, श्री अनुप डांगे, महिला पोलीस उप निरीक्षक रूपाली कदम, द.नि.क., व जे.जे मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक श्री राजेंद्र मुरदारे, पो.ह.क्र 31475/नालंदा लोखंडे, पो.ह.क्र 050488/सचिन पाटील, पोशिक्र 060386/शशिकांत जाधव, व पोशिक्र. 090675/संदीप भोळे हया पथकाने अत्यंत कौशल्यपुर्ण तपास करून व अथक परीश्रम घेवून दक्षिण नियंत्रण कक्षास खोटी माहिती देणारा नागपुरचा रहिवाशी असलेल्या आरोपीस डहाणु, जिल्हा-पालघर याठिकाणाहून अवघ्या 09 तासाचे आत ताब्यात घेतले. सदर आरोपी विरूध्द सर जे.जे. मार्ग पो.ठाणे कलम 506(2), 505(1), 182, 179 भा.दं.वि अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

|