Header Ads Widget


जबरी चोरी प्रकरणी एका इसमास अटक करुन ३,७५,०००/- चा मुद्देमाल हस्तगत

सातारा, दि. २७/०२/२०२३.
दिनांक २१/०२/२०२३ रोजी रात्री ९.३० वा.चे. सुमा बॉम्बे रेस्टॉरंट ब्रीज ते कोल्हापूर कडे जाणारे सर्व्हीस रोडवर एका इसमाने बंदुकीचा धाक दाखवुन तक्रारदार यांचे ताब्यातील महिन्द्रा कंपनीची स्कार्पिओ जीप ही जबरदस्तीने चोरी करून नेहली होती. सदर बाबत सातारा शहर पोलीस ठाणेस भादवि कलम ३९२ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधिक्षक, समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक, श्री. बापू बांगर, पोलीस उपअधिक्षक, गणेश किंद्रे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा व मुद्देमालाचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर, यांचे मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी श्री. एस. बी. मोरे व डीबी पथकातील कर्मचारी यांनी ढालगाव ता. कवठेमहाकांळ जि. सांगली येथून एका इसमास ताब्यात घेवुन त्याचेकडून जबरदस्तीने चोरी केलेली ३,००,०००/- रुपये किमतीची महिन्द्रा कंपनीची कार व ७५,०००/- रुपये कि. मोबाईल फोन सह ३,७५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमालासह आरोपीस अटक केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक. श्री. बापू बांगर, पोलीस उपअधिक्षक, गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, अभय साबळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश घाडगे, गणेश भोंग, विशाल धुमाळ यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments

|