Header Ads Widget


शुल्लक कारणावरून महिलेचा खून

 

रायगड, दि. २७/०२/२०२३.
तळा पोलीस ठाणे हद्दीत दि. 25/02/2023 रोजी 10:15 वा.सुमारास मौजे कोळीवाडा मांदाड येथे मयत महिला रा.कोळीवाडा, मांदाड, ता.तळा ही बंदर येथुन मच्छि घेवुन घरी येत असताना यांतील संशयीत आरोपी रा.कोळीवाडा, मांदाड, ता.तळा याने मच्छि न दिल्याने मोठ मोठयाने वाद करून मयता जवळील खरळ/विळा घेवुन मयताचे तोंडावर, डोळयावर, नाकावर, ओठावर मारून गंभीर दुखापत करून जिवेठार मारले. सदर गुन्ह्यातील आरोपी यास दिनांक 25/02/2023 रोजी 20:46 वा.सुमारास अटक करण्यात आली आहे.
याबाबत तळा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 23/2023 भा.दं.वि.क. 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस निरीक्षक बी.अे.पवार हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|