Header Ads Widget


शहादा येथील चर्मकार समाजाला जातिवाचक शिवीगाळ प्रकरण संदर्भात अक्कलकुवा चर्मकार समाजाच्या बांधवांनी विधान परिषदेचे सदस्य आ.आमश्या पाडवी यांना निवेदन...


प्रतिनिधी | अक्कलकुवा

      फुले, शाहु, आंबेडकरांच्या राज्यात चांभार समाजाला जातिवाचक शिवीगाळ करणारे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व पोलीस कॉन्स्टेबल यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अस्पृश्यता निवारण कायदया नुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा विषय मांडुन जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती सरकारला द्यावी असे साकडे शहादा व अक्कलकुवा येथील चर्मकार समाजाच्या बांधवांनी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांना घातले आहे. यासंदर्भात आमदार आमश्या पाडवी यांना निवेदन देण्यात आले 
        चर्मकार समाजाच्या बांधवांनी आमदार आमश्या पाडवी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक 23/09/2023 रोजी चर्मकार गणेश मंडळाची मिरवणूक काढण्यात आली होती सदर मिरवणुक शांततेत पार पडली व दिनांक 24/09/2023 रोजी प्रकाशा येथे विसर्जनासाठी गेले असता दुपारी शहादा पोलीस स्टेशन येथून कर्मचारी मुकेश राठोड यांनी मंडळाचे अध्यक्ष छोटू अहिरे यांना फोन करुन सर्व मंडळाचे पदाधिकारी यांना शहादा पोलीस स्टेशनला बोलाविले त्यानुसार सर्व मंडळाचे कार्यकारणी व समाज बांधव शहादा पोलीस स्टेशनला गेले असता तेथील पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी समस्त चर्मकार बांधवांना पोलीस स्टेशनच्या केबिनमध्ये बोलवुन अरेरावीची भाषा करून तुमची येथे बसायची लायकी नाही व तुम्ही गणपतीच्या वेळी तुमचे जात दाखवून देतात असे जातीवाचक सांगितले याबाबत समाज बांधवांनी प्रांताधिकारी शहादा,उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार करुन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मात्र सुमारे दीड महिन्याचा कालावधी लोटून देखील अद्याप पर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे नमुद केले आहे तसेच  नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी दि. 17 रोजी शिष्टमंडळाला नंदुरबार येथे भेटीसाठी बोलावले मात्र त्यांनी देखील शिष्ट मंडळाला वेळ नसल्याचे सांगुन फक्त अध्यक्षांना बोलावून त्यांचा अपमान करुन कॅबिनच्या बाहेर हाकलून दिल्याची माहिती चर्मकार समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार आमश्या पाडवी यांना दिली व येत्या हिवाळी अधिवेशनात सदर विषयाचा आवाज उठवुन नंदुरबार जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्थेची माहिती शासनाला करुन द्यावी अशी विनंती केली यावर समाज बांधवांवर झालेल्या अन्यायाचा मुद्दा व भावना विधान परिषदेत मांडण्याचे आश्वासन आमदार आमश्या पाडवी यांनी संबंधितांना दिल्या. छोटु अहिरे, संतोष अहिरे, जगदीश चव्हाण,गुलाब अहिरे, चंद्रकांत अहिरे, विजय अहिरे, अक्षय अहिरे, हिम्मत अहिरे, महेंद्र अहिरे यांच्या सह शिष्टमंडळाने आ.पाडवी यांची भेट घेतली.

Post a Comment

0 Comments

|