धुळे/ प्रतिनिधी
राज्य स्तरीय रस्सीखेच स्पर्धेत नूतन माध्यमिक विद्यालय दोंडाईचा येथील १९ वर्षातील मुलांचा संघ अजिंक्य (सुवर्ण पदकाचे मानकरी) ठरले तर १७वर्षातील मुलांच्या संघास कांस्य पदक (राज्य स्तरीय रस्सीखेच स्पर्धेत तृतीय पारितोषिक) मिळवले. दिनांक १८नोव्हे. २०२३ रोजी चिंचणी (पालघर) येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत नूतन माध्यमिक विद्यालय दोंडाईचा येथील १७ व १९ वर्षर्षातील मुलांच्या संघांनी धुळे जिल्हा रस्सीखेच असोसिएशन चे अध्यक्ष आणि ज्ञानोपासक शिक्षण संस्थेचे सचिव श्री. दादासाहेब अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला होता, त्यामध्ये १९ वर्षर्षातील मुलांच्या संघाने अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई विरुद्ध धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणान्या नूतन माध्यमिक विद्यालयाच्या संघाने एकतर्फी विजय मिळवित राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये अजिंक्य पद मिळविले असून प्रथमच सुवर्ण पदक मिळविले आहे. राज्यस्त्रीय स्पर्धेमध्ये नूतन माध्यमिक विद्यालयाच्या या दोन्ही संघांनी प्रथमच प्रवेश घेतला होता.
नूतन माध्यमिक विद्यालय इंदवे शाळेचे विद्यार्थी, वयोगट -19 वर्षे
राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत नुतन माध्यमिक विद्यालय दोंडाईचा येथील संघात दोंडाईचा शाळेचे क्रीडा शिक्षक अमोल पाटील सरांनी क्रीडा असोसिएशन तर्फे नोंदणी करुन राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत प्रवेश मिळवून दिला व गौरवाची बाब म्हणजे 1-साहिल र ईस कुरेशी
2-महेश विश्वास शिंदे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच 17 वयोगटात
1-प्रभाकर पद्मोर
2-सुमीत मासुळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब बी.एस.पाटील , आबासाहेब दिनकरराव पाटील, अॅड.नानासाहेब एस.जे.भामरे, डॉ.आण्णासाहेब पी.डी.देवरे, तात्यासाहेब संजय देसले, भाऊसाहेब शशिभूषण देसले, डॉ.अमित पाटील सर,के.एच.मोरे,व्ही.एम.देवरे ,एस.डी.अहिरराव यांसह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर वृंद,पालक वर्ग यांनी उत्तुंग यशाबद्दल कौतुक करून अभिनंदन केले.तसेच नुतन माध्यमिक विद्यालय इंदवे शाळेतील माजी पर्यवेक्षक ए.जी.पाटील सर यांनी देखील सर्व विजयी विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले व अभिनंदन करुन पुढील वाटचाली साठी सर्वांना शुभेच्छा दिल्या..
0 Comments