Header Ads Widget


थोर महापुरुषांचा सन्मान राखला जावा, महापुरुषांना नियमित अभिवादन केले पाहिजे, दीपोत्सवानिमित्त दीप लावून अभिवादन ; प्रा. गणेश सोनवणे व सहपरिवार


प्रतिनिधी /शहादा

       वसुबारसपासून खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला सुरुवात होते. गुरुवारी या निमित्ताने शहरातील स्वातंत्र्यसैनिक व महापुरुष यांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता आदर म्हणून शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्याजवळ तसेच स्मारकाच्या ठिकाणी परिवारासह जाऊन दीपोत्सवानिमित्त दीप लावून त्यांना अभिवादन करण्यात आला हा उपक्रम राबवणाऱ्या प्रा गणेश सोनवणे व परिवाराचे कौतुक केले जात आहे
       
प्रा गणेश सोनवणे त्यांच्या पत्नी विद्या सोनवणे मुलगी पायल व मुलगा कौस्तुभ सोनवणे यांनी वसुबारसच्या दिवशी एक आगळी वेगळी दिवाळी मानविण्यचे ठरविले. दीपावली हा सण हिंदू धर्मीयांसाठी व भारतीयांसाठी महत्वाचा मानला जातो . आपण भारतीय म्हणवून घेतो यासाठी , धर्म जागृती साठी, ज्यांनी स्वातंत्र्य, स्वराज्य दिल, देवपूजा करण्यास परवानगी मिळवून दिली , उदरनिर्वाह होण्याची सोय उपलब्ध करून दिली व शिक्षणासाठी स्त्रियांना दालन उघडून दिली , देशासाठी समर्पण करणाऱ्या भारतीयांसाठी आपण सहकटुंब मिळून त्या जागेवर दिवा लावत दिवाळीचा पहिल्या दिवसाची सुरुवात करावी ही संकल्पना विद्या सोनवणे व परिवाराने साकारण्याचे ठरविले.  
       याची सुरुवात शहरातील स्वामी समर्थ केंद्र, आई म्हाळसा देवी मंदिर , श्री महाराणा प्रतापसिंह यांचे स्मारक, महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज , भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, राष्ट्रपिता महात्मा गांधी या थोर महापुरुषांचे पुतळे , नगरपालिका कार्यालया जवळील स्वातंत्र्य सैनिकांच्या मुद्रा स्मारक स्थळी व प्रेम संकुल येथील स्व नानासाहेब जाधव यांच्या प्रतिमापुढे दीप लावून अभिवादन केले. स्मारक व पुतळा असलेल्या जागेची स्वच्छता करून त्या ठिकाणी विद्या सोनवणे यांनी रांगोळ्या देखील काढल्या,

  स्वातंत्र्यसैनिक महापुरुषांच्या सन्मान राखला जावा महापुरुषांना नियमित अभिवादन केले पाहिजे त्यांच्या आदर व सन्मान राखला गेला पाहिजे ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी बलिदान दिले त्यांची आठवण राष्ट्र प्रेमासोबत जपली गेली पाहिजे यासाठी त्यांच्या पुतळावर स्मारक स्थळे दीप लावून परिवारासह अभिवादन केले..
     

Post a Comment

0 Comments

Today is Wednesday, May 7. | 10:13:25 PM