धुळे/ प्रतिनिधी
शहरातील पाच कंदील जवळील मच्छी मार्केट आठ वर्षांपूर्वी धुळे महापालिका प्रशासनाने उद्ध्वस्त केले आहे. परंतु त्यानंतर नव्याने त्या ठिकाणी मच्छी मार्केटची उभारणी केलेली नाही. यामुळे धुळे शहरातील मच्छी विक्रेते आपल्या हक्काच्या मार्केट पासून गेल्या आठ वर्षांपासून वंचित आहेत.
याबाबत समाजवादी पार्टी धुळे महानगर अध्यक्ष श्री. गुड्डू भाऊ काकर यांच्या नेतृत्वात आज मच्छी मार्केटच्या पुनर्उभारणी करून पुनर्वसन बाबत, धुळे महापालिकेच्या आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील यांची समाजवादी पार्टीच्या पदाधिकार्यांनी भेट घेतली. व सदरची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. धुळे महापालिकेच्या मालकीचे, महापालिकांच्या प्रशासनाने नमुद मच्छी मार्केट स.न. २०१५ साली जमीनदोस्त केले व तिथे मच्छी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या पोटापाण्याचा काहीही विचार न करता धुळे महापालिका प्रशासनाने पोलीस स्टेशनसाठी सदरची जागा देऊन टाकली होती. व तेथील मासे विक्रेत्यांना नवीन संकुल उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु आज तब्बल आठ वर्षे उलटून देखील मासे विक्रेते त्यांच्या हक्काच्या जागेपासून उपेक्षीत आहेत. तेथील मासे विक्रेत्यांची फसवणूक धुळे महानगरपालिका प्रशासनाकडून झाली असून, मासे विक्रेत्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. लवकरात लवकर सर्व मासे विक्रेत्यांना ठीक नवीन संकुल उभारण्याची गरज असल्याचे निदर्शनात आणून श्रीमती अमिता दगडे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे धुळे महानगर समाजवादी पार्टी तर्फे मागणी करण्यात आली आहे.
निवेदन स्वीकारते वेळी आयुक्त श्रीमती पाटील यांनी सदर प्रस्ताव बाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. यावेळी समाजवादी पार्टी धुळे महानगर अध्यक्ष श्री. गुड्डू भाऊ काकर, ॲड.इमरान शेख , जमील मंसुरी, अकील अहमद अन्सारी, गुलाम अहमद खाटीक, अशपाक मंसूरी, नवाब खान आदि उपस्थित होते.
0 Comments