नंदुरबार/प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात पुनश्च गांजाची शेती आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून दोन महिन्यापूर्वी नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्तची घोषणा करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या जिल्ह्यातून पुनश्च गांजाची शेती असल्याचे उघडकीस आल्याने, एकंदरीतच कुठेतरी नंदुरबार जिल्हा हा अंमली पदार्थ मुक्त झाल्याची घोषणा ही फोल ठरत असल्याचे दुसऱ्यांदा समोर आले आहे,केळी पिकाच्या आड होणारी गांजाची शेती नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उद्ध्वस् केली आहे. शहादा तालुक्यातील नवानगर शिवारातील शेतात पोलिसांनी केलेल्या कारवाईत १७ लाख ७४ हजार रुपये किंमतीचा २ क्विटल ५३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
शहादा तालुक्यातील नवानगर गावाच्या शेतामध्ये केळी पिकाच्या आड ओल्या गांजाची बेकायदेशीररित्या लागवड केली असल्याची माहिती पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील यांना मिळाली. याबाबत त्यांनी नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कारवाईच्या सूचना दिल्या. एलसीबीच्या पथकाने शहादा तालुक्यातील नवागाव शिवारात जावून वडगाव ते नवानगर रस्त्या दरम्यान एका केळीच्या शेताजवळ केले. त्यावेळी बांधावर उभ्या असलेल्या इसमाने पोलिसांना पाहताच पळ काढला. पथकाने पाठलाग करीत त्यास ताब्यात घेतले. सुनिल मेरसिंग चव्हाण (वय ४७, रा. नवानगर) असे संशयीताचे नाव आहे. पोलिसांच्या पथकाने शेतात जावून पाहणी केली असता केळी पिकाच्या आड हिरवट रंगाच्या गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे आढळून आले. यावेळी पथकाने शेत पिंजून काढत दोन क्विलट ५३ किलो ५८४ ग्रॅम वजनाची १७ लाख ७४ हजार ६२६ रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त केली आहे. याप्रकरणी सुनिल मेरसिंग चव्हाण याच्याविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनिमय १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) आयआय (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक निलेश तांबे,शहाद्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलिस हवालदार संदीप गोसावी, पोना. सुनिल पाडवी, मोहन ढमढेरे,विशाल नागरे, बापू बागूल, पुरुषोत्तम सोनार, विकास कापूरे, अविनाश चव्हाण, पोलिस अंमलदार विजय द्विवरे, शोएब शेख, दिपक न्हावी, यशोदीप ओगले, हेमंत बारी, हेमंत सैंदाणे, उदेसिंग तडवी यांच्या पथकाने केली.
0 Comments