अक्कलकुवा/प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील 33/11 KV उपकेंद्रात 20 वर्षापुर्वी 5 MVA क्षमतेचे रोहीत्र बसविण्यात आले आहे, आता सध्या तो रोहित्र अती भारीत व जुना झालेला आहे, त्यामुळे त्या जागी 10 MVA क्षमतेचे रोहीत्र तात्काळ मंजूर करुन ते कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमशा पाडवी यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.
नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात वीज वितरण संबंधी सर्वसाधारण आढावा सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी ही मागणी केली, निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा येथील 33/11 KV उपकेंद्रात 20 वर्षापुर्वी 5 MVA क्षमतेचे रोहीत्र बसविण्यात आले आहे आता सध्या तो रोहित्र अती भारीत व जुना झालेला आहे, त्यामुळे तो सतत नादुरुस्त होऊन वारंवार विज पुरवठा खंडित होत असतो, परिणामी वेळी अवेळी नागरिकांना अंधाऱ्यात तासनतास राहावे लागते, अति भारामुळे शेतीसाठी व गावठाणात एकाच वेळी वीज पुरवठा करता येत नाही, गावठाणाला विद्युत पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणारा विज पुरवठा बंद करावा लागतो तर शेतकऱ्यांना विज पुरवठा करतांना गावठाणातील विज पुरवठा बंद करावा लागतो, परिणामी ग्रामस्थांचे अतोनात हाल होत असुन शेतकऱ्यांचे ही मोठे आर्थिक नुकसान होत आहे, त्यामुळे गावठाण व शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपकेंद्रातील 5 MVA क्षमतेचे रोहित्र बदलुन तेथे 10 MVA क्षमतेचे रोहित्र तात्काळ मंजुर करण्यात यावे, अशी मागणी आमदार आमशा पाडवी यांनी केली आहे.
0 Comments