नंदुरबार/प्रतिनिधी
नंदुरबार येथे समस्त आदिवासी समुदायाच्यावतीने राज्य शासनाच्या सेवेत बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरीत बोगस आदिवासींचे जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून घुसखोरी केलेल्या भरतीच्या विरोधात, तसेच विविध मागण्यांकरिता, मागील गेल्या तीन दिवसांपासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू असून, या धरणे आंदोलनास विधान परिषदेचे अक्कलकुवा येथील आमदार आमशा पाडवी यांनी पाठिंबा दिला आहे, तसेच या आंदोलनास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री एडवोकेट पद्माकर वळवी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य सी के पाडवी, नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक यांनी देखील पाठिंबा दिला असून, आज तिसऱ्या दिवशी नंदुरबार येथे मोठ्या संख्येने आदिवासी समाजातील विविध पक्षातील राजकीय नेते, तथा सामाजिक संघटनांनी या धरणे आंदोलनास पाठिंबा देत, आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे, यावेळी विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी सरकार विरोधात आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
0 Comments