नंदुरबार/प्रतिनिधी
नंदुरबार शहर पोलिस ठाण्याच्यावतीने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर - पोलिसांनी शहरातील प्रमुख भागातून रुटमार्च केला.
राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सुरु आहेत. म्हणून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार शहर पोलिस ठाण्यातर्फे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे शहरातून पथसंचलन करण्यात आले , सदर रूटमार्च सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास महात्मा ज्योतीबा फुले पुतळा मोठा माळीवाडा परिसरातून रुटमार्चला सुरुवात झाली.
पोलिसांचा हा रुटमार्च इलाही चौक, फडके चौक, सोनारखुंट, मा. ना. महाराष्ट्र व्यायामशाळा, हाटदरवाजा, गांधी पुतळा, नेहरु पुतळा मार्गे शहर पोलिस ठाण्यात येवून समारोप झाला.
या पथसंचलनात नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व ३४ अंमलदार, जिल्हा पोलिस मुख्यालयाचे ६० अंमलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे ५ अंमलदार उपस्थित होते.
0 Comments