Header Ads Widget


नवापूर वनपरिक्षेत्र हद्दितीतील वनविभागाच्या कारवाईत साग लाकडाचे 50 हजार रुपये किमतीचे 26 नग न्यू होंडा करंजी येथून जप्त...




नंदूरबार/प्रतिनिधी:-दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 रोजी वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक यांना मिळालेल्या गुप्तबातमीवरून सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक स्नेहल अवसरमल यांच्यासह रेंज स्टाफ नवापूर प्रादेशिक, शासकीय वाहनाने नवापूर शिवारातील न्यू होंडा करंजी ओवरा नवापूर येथील महसूल हद्दीतील एका पडीक पडसाळीत जाऊन पाहाणी केली असता, ताज्या तोडीचे लपवलेले साग चौपाट 26 नग आढळून आले.
 सदरचा माल जप्त करून शासकीय वाहनात भरुन शासकीय विक्री आगार, नवापूर येथे आणून पावतिने जमा  केला. जप्त करण्यात आलेल्या मालात साग लाकडाचे चौपाट एकूण नग 26, एकुण अंदाजीत घन मीटर 0.350 या मालाची किंमत बाजार भावानुसार 40 ते 50 हजार अंदाजित रुपये  एवढी असून, सदर कार्यवाही नवापूर वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल, वनपाल बी.एस. दराडे, एस. एस. पाटील, वनरक्षक कमलेश वसावे, गिरीश वळवी, विकास शिंदे, वाहन चालक निलेश गावित व वनमजूर कांतू गावीत यांनी सहभाग घेतला. सदर कार्यवाही ही वनसंरक्षक धुळे रंजन, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार कृष्णा भवर, विभागीय वनाधिकारी दक्षता पथक धुळे आर. आर. सदगीर, सहाय्यक वनसंरक्षण प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार धनंजय ग.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
वनक्षेत्रपाल नवापुर प्रा. नंदुरबार वनविभाग नंदुरबार यांजकडून जनतेस आवाहन करण्यात आले आहे की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा.

Post a Comment

0 Comments

|