Header Ads Widget


वनहक्क दावेदार शेतकऱ्याच्या उभे पिकात जेसिपी घालून काढणीला आलेले पीक उध्वस्त करु नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा : सत्यशोधक शेतकरी सभा

 




नंदुरबार/ प्रतिनिधी

   नवापूर तालुक्यातील झामांनझर(बेडकीपाडा)गावतील आदिवासीं वन हक् धारक शेतकऱ्याच्या उभे पिकात जिसिपी खालून काढणीला आलेले पीक उध्वस्त करून लघु पाटबंधारां बांधण्यासाठी खोदकाम सुरू केले आहे शेतकऱ्यांनी 20 वर्षा पूर्वी लावलेले आब्याचे झाडे तोडण्यात येत आहे.


    निसर्गाने निर्माण केलेले हजारो झाडे तोडण्यात येणार आहेत आज एका बाजूला 33 कोटी झाडे कागदावर लावून शाशना कडून बीले लाटली जातात आणि निसर्गाने उपज केलेली झाडे तोडून पर्यावरण नष्ट केले जात आहे ,आदिवासींने पोटा साठी जुडपे साप केली तरी त्याच्यावर केसेस करून जेल मध्ये टाकले जाते इकडे तर रक्षण करतेच हजारो झाडे तोडणार आहेत यांना कोण जाब विचारणारआज नवापूर तालुक्यातील शेतकर्याला दुष्काळा ची झळ पोहचत आहे.
काही प्रमाणात पिके आलेली असताना ती सुधा वनखाते उध्वस्त करीत आहे आदिवासी वन हक 2006 नियम 2008 सुधारित अधिनियम 2012ची अमलबजावनी 17 वर्ष उलटून सुधा कायद्याची अंमलबजावणी होत नाही आणि वनखाते दिवसा ढवळ्या पिके उध्वस्त करीत आहे, तरी काही गावात बगोस धाडी टाकून घर उपयोगी सामान जप्त करीत आहे विधवा महीलाचे घर सुधा सोडले नाही अशा आदिवासी विरोधी वनखात्याचेहे बेकायदेशीर खोदकाम त्वरित बंद करून आदिवासींना न्याय द्यावा, नाहीतर सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभे तर्फे वनखात्याच्या कार्यालय समोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन करण्यात येईल त्याबाबत चे निवेदन रेंज आफिस नवापूर व मा.तहसीलदार नवापूर यांना व काल जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments

|