अक्कलकुवा/ प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा येथे शेतकरी सहायता उपक्रम एक दिवशीय कार्यशाळा संपन्न.
अक्कलकुवा तालुक्यातील अती दुर्गम भागातील पिंपळखुटा या गावी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग तसेच आश्रय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सहायता उपक्रम एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत तालुक्यातून 115 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. आशुतोष पाटील हे होते. आशुतोष पाटील यांनी विद्यापीठ कार्यप्रणाली याबाबत सखोल मार्गदर्शन केले . कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी निलेश गढरी ,कृषी पर्यवेक्षक दिलीप गावित, मागत्या वसावे यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या विविध योजना केंद्रीय शेती काळाची गरज ,पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन ,शेती पूरक व्यवसाय या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश कहार यांनी केले .यावेळी जिल्हा परिषद सदस्य निर्मला राऊत, पंचायत समिती सदस्य अशोक राऊत ,अपसिंग वसावे, विद्यापीठाचे प्रतिनिधी सुभाष पवार, आश्रय संस्थेचे अध्यक्ष योगेश कहार, हरिष मोरे ,भटू वाघ ,शिवदास पवार उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू बैसाणे यांनी केले.
0 Comments