Header Ads Widget


अवैद्य मद्य वाहतुकीवर पिंपळनेर पोलिसांची धडक कारवाई; देशी विदेशी कंपनीच्या मद्य व वाहनसह ११,७२,२०० रु. किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत...


साक्री प्रतिनिधी/अकिल शहा


मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय बारकुंड सो,धुळे यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान अवैद्य धंदे बाबत तसेच आंतरराज्य मद्य तस्करीचे समूळ उच्चाटन करणेबाबत विशेष सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीतील आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा सीमांवर वेळोवेळी पेट्रोलिंग, नाकाबंदी लावण्यात येऊन तसेच गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त करण्यात येत होती. दिनांक.०९/०६/२०२३ रोजी रात्रीचे ०८:३० वाजेच्या सुमारास आंतरराज्य सीमा भागात पेट्रोलिंग सुरू असताना सपोनि/ सचिन साळुंके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, अवैद्य रित्या दारू तस्करी होत आहे खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना नवापूर रोडवरील मळगाव शिवारातील कळंबारीत संशयित वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहनावरील चालकाने काही अंतरावर वाहन थांबवून जंगल परिसरात अंधाराचा फायदा घेऊन जंगल परिसरात वाहन सोडून पळून गेला, सदर वाहनाजवळ जावून पाहिले असता वाहन क्रमांक जी.जे.२७ बी.एस ६४८७ असा असून सदर वाहन लॉक करून पळाल्याचे दिसून आले सदर वाहनात गोपनीय बातमीप्रमाणे अवैद्य मद्य साठा दिसून आला सदर वाहनाचे मागील सीटवर तसेच डिक्की मध्ये देशी विदेशी कंपनीचा दारू भरून घेऊन जात असताना निदर्शनास आले आहे सदर मद्य साठा हा गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी चोरटी वाहतूक करून घेऊन जात असले बाबत घेऊन आले आहे सदर मुद्देमालाची व वाहनाचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
१)४६,२०० रु.कि. रॉयल चॅलेंज नावाचे  ७५० एमएलच्या एकूण बॉटल १४० प्रति बॉटल ची किंमत ३३०/-
२)३७,२०० रु कि. ब्लँन्डर प्राईड ७५०एमएल एकूण बॉटल ६० प्रति बॉटल ची किंमत ६२०/-
३)१५,६०० रु कि. ऑल सिझन नावाचे ७५०एमएल च्या एकूण ४८ बॉटल, प्रति बॉटल ची किंमत ३२५/-
४)६,७२० रु.कि.हेवर्ड नावाचे ५००एमएल च्या एकूण बॉटल ९६ प्रति बॉटल ची किंमत ७०/-
५)४६,०८०रु. इंपिरियल नावाचे १८० एमएल च्या एकूण बॉटल ५७६ प्रति बॉटल ची किंमत ८०/-
६)२०,४०० रु. कि. रॉयल चॅलेंज नावाचे१८०एमएल च्या एकूण बॉटल२४० प्रति बॉटल ची किंमत८५/-
७)१०,००,००० रु. कि. क्रेटा कार क्रमांक जी.जे २७ बी.एस६४८७ जुनी वापरती. असा एकूण ११,७२,२००/-
  वरील वाहन चालक याने अवैधरित्या मद्यवाहतूक करण्याचे उद्देशाने विदेशी मद्याचा नवापूर रोडवरील मळगाव शिवारातील कळंबारीत संशयित वाहनास थांबविण्याचा प्रयत्न करून सदर वाहन हे काही अंतरावर चालकाने थांबवली व घनदाट जंगलभाग असून अंधार असल्याने त्या परिस्थितीचा फायदा घेऊन वाहन लॉक करून परिसरात पळून गेला वाहनात मागील सीटावर व डिक्की मध्ये मद्य भरून वाहतूक करीत असताना मिळून आले याबाबत पिंपळनेर पोलीस स्टेशनला सीसीटीएनएस गुरनं ०१४५/२०२३, महाराष्ट्र दारूबंदी अधि.कलम ६५(अ)(ई), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे असई बी.आर. पिंपळे करीत आहेत.
  सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड सो.,मा. अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन साळुंके,पोसई भाईदास माळचे,असई लक्ष्मण गवळी,पोहेकाँ ६३१ कांतीलाल अहिरे कांतीलाल अहिरे, पोहेकाँ.प्रकाश सोनवणे, पोकाँ संदीप पावरा,राकेश, पोका पंकज माळी, कैलास कोळी, विजयकुमार पाटील, रवींद्र सूर्यवंशी, पंकज वाघ, नरेंद्र परदेशी अशांचा सहभाग आहे.

Post a Comment

0 Comments

|