Header Ads Widget


मका खरेदीसाठी शेतकऱ्यांनी 15 जून पर्यंत नोंदणी करावी..

नंदुरबार/प्रतिनिधी 

 आदिवासी उपयोजना क्षेत्रातील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगांव येथे आधारभुत खरेदी योजनेतंर्गत भरडधान्य (मका ) खरेदीसाठी शेतकऱ्यांनी (कास्तकार) 15 जून 2023 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नंदुरबारचे व्यवस्थापक तुषार वाघ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

शासकीय आधारभुत खरेदी योजनेतंर्गत मकासाठी 1 हजार 962 दर निश्चित केला आहे. खरेदी केंद्र व खरेदी केंद्राचे प्रमुखाचे नाव व संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहे. नंदुरबार तालुक्यात धानोरा व लोणखेडा व्ही. बी. पाडवी ( 9689650893 ), टोकरतळे एन.बी. वळवी, (9730804672 ) वावद एस.ए.पावरा (9404577293 ) नवापूर तालुक्यात नवापूर कोठडा, विसरवाडी, खांडबारा एम.आर.गिरासे (9403940976 ) शहादा तालुक्यात मंदाणा एन.बी. जमादार ( 9673302279 ), तळोदा तालुका प्रतापपूर (संस्थेचे) एन.बी.पावरा (8805592439) शिर्वे एम.डी.सोनवणे ( 9403608694 ) अक्कलकुवा तालुका खापर एन.बी.पावरा (9420057354 ), मोलगीसाठी जी.डी.पावरा ( 8261865793 ) तसेच धडगाव तालुक्यातील धडगावसाठी जी.डी.पावरा ( 8261865793 ) असे आहेत.

वरील भागातील शेतकरी / कास्तकारांनी आपले भरडधान्य ज्वारी व मका खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी वर्ष 2022-2023 मधील रब्बी पिकपेरा असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड, बॅक पासबुकची छायाप्रतीसह नोंदणीसाठी स्वत: उपस्थित राहावे, असे श्री. वाघ यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments

|