Header Ads Widget


14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे गुन्हा- म.ज.सुर्यवंशी


 नंदुरबार/ प्रतिनिधी 


 बालकामगार कायद्याचे पालन होण्यासाठी दुकाने, आस्थापना, कारखाने, सिनेमागृह, उपहारगृह, हॉटेल व गॅरेज या ठिकाणी 14 वर्षाखालील बालकांना व 14 ते 18 किशोर वयोगटातील बालकांना कामावर ठेऊ नये. अशी मुले कामावर ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्रीमती.म.ज.सुर्यवंशी  यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ अंतर्गत जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून 12 जून हा दिवस साजरा केला जात आहे. 14 वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियामध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्ह्यासाठी 6 महिने ते 2 वर्ष पर्यंत वाढविता येईल इतक्या तुरूंगवासाची शिक्षा किंवा किमान 20 हजार रूपये व कमाल 50 हजार रूपये इतका दंड किंवा दोन्ही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान 1 ते 3 वर्ष पर्यंत वाढविता येईल इतकी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. बालकास किंवा किशोरवयीन बालकास कामावर ठेवल्याचे आढळल्यास कामगार कार्यालय, धुळे यांच्या glodhule@yahoo.com  या ईमेवर संपर्क साधावा. असे श्रीमती सुर्यवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

0 Comments

|