नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण / उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समाजकंटक व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अवैध अग्निशस्त्र व शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कायदेशीर करणेबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना मासिक गुन्हे सुचना दिल्या होत्या. वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अवैध अग्निशस्त्र व शस्त्र बाळगणाऱ्यांची इत्यंभूत माहिती घेवून आपल्या बातमीदारांमार्फत माहिती घेत होते. दिनांक 11 जून 2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांना माहिती मिळाली की, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील अक्राळे गावात राहणारा दिलीप चव्हाण या इसमाकडे गावठी बनावटीचे पिस्तुल असून तो ते पिस्टल कब्जात बाळगून फिरत असतो, अशी माहिती दिली. सदरची माहीती नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून माहीतीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना तात्काळ नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आक्राळे गावातील संशयीत इसमाची माहिती काढून त्यास ताब्यात घेणेसाठी रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत इसम दिलीप चव्हाणची माहिती काढून त्याच्या राहत्या घराच्या आजू-बाजूला साध्या वेषात सापळा रचून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास नाव गाव विचारले असता दिलीप गोपा चव्हाण वय 55 वर्षे रा. अक्राळे ता.जि. नंदुरबार असे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाची झडती घेतली असता त्याच्या कब्जात 35 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व व 4000/- रुपये किमतीचे 4 जिवंत काडतूस मिळून आल्याने त्यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाविरुध्द् नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने गावठी बनावटीचे पिस्टल कोठुन आणले ? याबाबत माहिती घेण्यात येत आहे. तसेच सदर गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी सांगितले. सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस अमंलदार शोएब शेख, किरण मोरे, विजय ढिवरे यांनी केली आहे.

0 Comments