प्रतिनिधी/ अकिल शहा
साक्री तालुक्यातील उभंड ते दगडीवीहीर ते इच्छापुर या रस्त्याचे काम त्वरित चालू करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेना विभाग प्रमुख राहुल राठोड यांनी दिलेला आहे गेल्या 70 ते 75 वर्षापासून दगडीविहीर गावकरी पायी प्रवास करत आहे रस्त्याचे काम रखडल्यामुळे शेतकरी असो व विद्यार्थी असो यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो.
शेतकऱ्यांना रस्ता नसल्या कारणामुळे देखील आपल्या मालाला भाव मिळत नाही व विद्यार्थ्यांना गावात बस सेवा येत नसल्या कारणामुळे आपले शिक्षण सोडावे लागते सतत पाठपुरावा करूनही या रस्त्याकडे कुठल्याही शासकीय अधिकारी लक्ष देत नाही म्हणून सी जी शिंपी नायक तहसीलदार यांना निवेदन व बांधकाम विभाग साक्री यांना देखील निवेदन दिले आणि लवकरात लवकर या रस्त्याचे काम करा अन्यथा होणाऱ्या परिणामाला सर्व सरकारी कर्मचारी व लोक प्रतिनिधी जबाबदार राहतील यावेळी उपस्थित उभंड गावाचे गटनेते योगेश भाऊ पाटील युवा सेना विभाग प्रमुख राहुल राठोड सुखदेव पवार शरद चव्हाण गोकुळ चव्हाण कृष्णा पवार किसन सोनवणे अशोक सोनवणे व दगडीवीहीर गावातील ग्रामस्थ हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments