नंदुरबार/ प्रतिनिधी
नंदुरबार‘शासन आपल्या दारी’ अभियान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागाने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील वीर बिरसा मुंडा सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपवनसरंक्षक कृष्णा भवर, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, परिविक्षाधिन अधिकारी अंजली शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, पोलीस उपअधिक्षक विश्वास वळवी, यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत नंदुरबार येथे मुख्य जिल्हास्तरीय कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या 8 व 9 जुलै, 2023 रोजी घेण्याचे नियोजित असून हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करावे.
प्रत्येक विभागाने या कार्यक्रमात प्रत्यक्ष लाभ देणाऱ्या लाभार्थ्यांची संपूर्ण नाव व पत्तासह अद्ययावत माहिती 1 जुलै पर्यंत सादर करावीत. मुख्य कार्यक्रमाच्या स्थळी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा स्टॉल लावावा. स्टॉलवर संपुर्ण योजनेची माहिती व आवश्यक फॉर्म लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देवून शक्य झाल्यास लाभार्थ्यांना जागेवर लाभ देण्यात यावा. यापुर्वी अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांच्या अर्जाची त्रृटीची पुर्तता त्वरीत करावी. अधिकाधिक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यात येवून जास्तीत जास्त लाभार्थी उपस्थित राहण्यासाठी आवश्यक नियोजन करावे अशा सूचना त्यानी यावेळी दिल्या आहेत. प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. बैठकीस सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

0 Comments