Header Ads Widget


नंदुरबार शहरात अवैधरित्या बोअरवेलचा वापर करणारे सात आस्थापनांवर कारवाईचा बडगा,पुलकित सिंह यांची कारवाई..

 

नंदूरबार/प्रतिनिधी

नंदुरबार शहरात मागील गेल्या कित्येक वर्षापासून अवैधरित्या बोअरवेलचा वापर करणारे सात अस्थापने नंदूरबार येथील तहसील कार्यालयात परिविक्षाधीन तहसीलदार म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर पुलकित सिंह यांनी टाळे ठोकले आहे. त्याचप्रमाणे बल्क वॉटर सप्लायर व पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर युनिट धारकानी दि. 27 जून पर्यंत केंद्रीय भूजल प्राधिकरण व राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे ऑनलाईन अर्ज दाखल करून कायदेशीर नाहरकत परवाना प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा तहसील प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. नंदुरबार शहरतील व तालुक्यातील अनेक खाजगी वॉटर फिल्टरधारक वाणिज्य वापरासाठी भूगर्भातून पाणी काढून विक्री करत असल्याची बाब परिविक्षाधीन तहसीलदार पुलकित सिंह यांच्या निदर्शनास असून, सदर भूगर्भातून पाणी काढुन त्याचा वैयक्तिक लाभासाठी व्यवसाय करणे, तसेच सदर पाण्याचा स्त्रोत नष्ट होऊन पाणी टंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वॉटर फिल्टरधारक केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतत पालन करतात किंवा अनधिकृत बोअरवेल तपासणीत अनियमितता आढळल्यास सदर बोअरवेल सिल करणे व विद्युत पुरवठा बंद करण्याच्या अधिकार आहे. तसेच बल्क वॉटर सप्लायर व पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर युनिट धारकानी केंद्रीय भूजल प्राधिकरण व राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे ऑनलाईन अर्ज दाखल करून कायदेशीर नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.
अश्या कोणत्याही प्रकारची कोणतीही परवानगी नाहरकत दाखले घेतलेले नसल्याची बाब तहसीलदार पुलकित सिंह यांच्या निदर्शनास आली असून, त्यामुळे बल्क वॉटर सप्लायर व पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर युनिट धारकानी, दि.27 जून 2023 पर्यंत संबंधीत यंत्रणेची/विभागाची कायदेशीर परवानगी घेऊन नाहरकत दाखले प्राप्त करुन घ्यावेत. तसेच आवश्यक शुल्क त्यांचेकडेस ऑनलाईन प्रक्रियेने जमा करुन त्याबाबत चलनाची प्रत आपल्या आस्थापनेत ठेवावी. तसे न आढलल्यास नियमानुसार कार्यवाही करण्याचा इशारा तहसीलदार पुलकित सिंह यांनी दिला आहे. आज झालेल्या कार्यवाहीत नंदुरबार शहरातील अवैध बोअर वेल वापर करणार्या 7 आस्थापनावर कारवाई करण्यात आली असून, त्यात एस्सार पेट्रोल पंप परिसर, दंडपाणेश्वर मंदिर परिसर, हॉटेल पी.जी.सन्स समोर परिसर, करण चौफुली परिसर, बाबा रिसॉर्ट परिसर तसेच दोंडाईचा रस्ता परिसर भागातील वॉटर युनिट धारकांचा समावेश आहे. असे सर्व ७ युनिट सिल करण्यात आले आहेत. सदर कार्यवाही तहसीलदार पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments

|