प्रतिनिधी/शेख इलियास
1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने ग्रुप ग्रामपंचायत अक्कलकुवा येथे उपसरपंच इम्रान मक्राणी यांचा हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न. महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्ताने ग्रुप ग्रामपंचायत अक्कलकुवा येथे विधान परिषद आमदार आमशा पाडवी व सरपंच उषाबाई बोरा यांचा मार्गदर्शनाने उपसरपंच इम्रान मक्राणी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते पृथ्वीसिंग पाडवी, व्यापारी आघाडी माजी जिल्हाध्यक्ष मनोज डागा, गेमा पाडवी, ग्रामपंचायत सदस्य दिपक वळवी, मोहसिन मक्रानी, इरफान मक्रानी, ग्रामसेवक किसन पावरासह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments