प्रतिनिधी /अकिल शहा
धुळे जिल्ह्यातील साक्री शहराचे सुपुत्र व सध्या नाशिक पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार जितू ठाकूर उर्फ जयवंत काशिनाथ सूर्यवंशी यांना त्यांच्या 33 वर्षातील पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 1 मे महाराष्ट्र दिनी नाशिक येथे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांचे हस्ते विशेष पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले.
पोलीस हवालदार जयवंत सूर्यवंशी अर्थात जितू ठाकूर हे साक्री शहरातील आदर्श विद्यालय व एस जी पाटील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांनी क्रिकेट, हॉलीबॉल ,सायकलिंग, बास्केटबॉल ,क्रॉसकंट्री आधी क्रीडा क्षेत्रात विद्यापीठ तसेच राज्यस्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत महाविद्यालयीन शिक्षणानंतर 1991 पासून नाशिक जिल्ह्यात पोलीस सेवेत नाशिक ग्रामीण क्राईम ब्रँच वाहतूक तसेच गोपनीय शाखेत विविध पदांवर त्यांनी सेवा बहाल केली आहे सद्या ते नागरी हक्क संरक्षण शाखेत पोलीस हवालदार या पदावर कार्यरत आहेत आपला हा सन्मान समस्त साक्रीकरांचा सन्मान आहे अशा भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या आहेत.
जितू ठाकूर यांच्या सन्मानाबद्दल नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे साहेब नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप साहेब पोलीस उपाधीक्षक माधुरी कांगणे मॅडम व पोलीस दलातील सर्व अधिकारी व सहकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले आहे.
त्यांच्या या सन्मानाबद्दल साक्री शहरातील त्यांचे हितचिंतक मित्र परिवाराने विशेष अभिनंदन केले आहे.
0 Comments