प्रतिनिधी/धडगाव
धडगांव तालुक्यातील खुटांमोडीचा पितीपाडा येथे नरपत इरमा वळवी यांच्या घराला अचानक आग लागली. त्यात संपुर्ण घर जळून राख झाले आहे. घराला आग लागल्याने आरडाओरड करीत तोपर्यंत उंचावर हवेशीर घर असल्याने हवेच्या जोराने घर काही वेळेतच घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्यसाठा तसेच बचतगटाच्या सौर उर्जेच्या मिळालेले चार पत्रेही जळुन गेले. घराला असलेल्या सागाच्या खांब माळाचे लाकुडसह संपुर्ण घर जळुन गेल्याने कुटुंब उघड्यावर आले. आग विझविण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही, त्यात लाखोंचे नुकसान झाले.
मुले थोडक्यात बचावली
नरपत वळवी हे घराच्या जवळील शेतात आंब्याचा झाडांसाठी कुंपण बनवित होता. त्यांची पत्नी गावातच नातेवाईकांकडे गेली होती. त्यावेळी घरात दोन मुले खेळत होती. त्यावेळेस घराला आग लागल्याने मुले घराबाहेर पळून गेल्याने ते वाचले.
0 Comments