नंदुरबार येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार संवाद परिषदेत बोलताना सांगितले की, रात्री 2 वाजेला सुरू होणाऱ्या नंदुरबार भाजीपाला, मार्केटची वेळ, बदलणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात शिवसेनेच्या शिंदे गटाने 18 जागांवर शिक्कामोर्तब केला असून, या निडणुक प्रक्रियेला काही तास उलटत नाही तोवर , विधान परिषदेचे माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी महाराष्ट्र दिनी औचित्य साधत शेतकऱ्यांच्या हिताचा धाडसी निर्णय घेतला आहे, महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात पत्रकार बांधवांसाठी शुभेच्छांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी आमदार रघुवंशी यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली, दरम्यान नंदुरबार शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये गेल्या कोरोनाच्या काळात खरेदी विक्रीचा व्यवहार रात्री 2 वाजेला सुरू करण्यात आला होता, तो आजतापर्यंत सुरूच आहे.रात्रीच्या सुमारास भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला विक्रीसाठी आणताना शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. अनेकदा रात्रीच्या सुमारास भाजीपाला आणताना वाहने नादुरुस्त किंवा अनेक समस्यांमुळे भाजीपाल्याची वेळ निघून जात असल्याने भाजीपाला दुसऱ्या दिवशी विक्रीला आणावा लागत होता. यामुळे आर्थिक नुकसान तसेच वेळही जात असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.
याबाबत शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये अनेकदा वादही उद्भवत होते, यामुळे रात्री 2 वाजेच्या या भाजीपाला मार्केटच्या खरेदी विक्रीला शेतकऱ्यांना कंटाळा वाटत होता.मात्र याची उशिरा का असेना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दखल घेतली आहे. दरम्यान काल दिनांक 1 मे 2023 रोजी आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते, यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा शेतकऱ्यांनी आम्हाला साथ दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न आम्ही सोडवू आणि भाजीपाला मार्केटमध्ये रात्री 2 वाजता सुरू असणारा, भाजीपाला खरेदी विक्रीचा व्यवहार पहाटे 5 वाजता तर दुपारी मार्केट 3 वाजेला सुरू करण्यात येईल असे सांगितले.
तसेच पूर्वपट्ट्यात आणि तालुका परिसरात कांद्याची लागवड करण्यात येते.त्यामुळे मार्केटमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते.यामुळे शहरालगत भाडेतत्त्वावर किंवा स्वमालकीची जागा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत घेऊन त्या ठिकाणी कांद्याचे मार्केट सुरू करण्यात येईल तसेच व्यापाऱ्यांनीही मार्केटमध्ये शेड उभारण्यात यावे.अशी मागणी केली होती त्यांची देखील मागणी लवकरच पूर्ण करण्यात येईल.असे आश्वासन त्यांनी उपस्थित पत्रकारांशी बोलतांना दिले आहे.
0 Comments