Header Ads Widget


दहावी बोर्डची परिक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शिराढोण ता. कळंब येथील परिक्षा केंद्रावर ग्रामपंचायतीच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिनीधी/बिलाल कुरेशी 

आज दि. ०2/०३/२०२३ पासून  सुरू झालेल्या दहावी बोर्ड परिक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शिराढोण ता. कळंब येथील परिक्षा केंद्रावर उपस्थित राहून ग्रामपंचायतीच्यावतीने शुभेच्छा देण्याथा आल्या.  सरपंच श्रीमती लक्ष्मीताई म्हेत्रे, व इतर मान्यवर यांनी स्वतः आपली उपस्थिती नोंदवत गुलाब पुष्प व  चॉकलेट देऊन विद्यार्थी हे वर्षभरापासून आपल्या जीवाचे रान करून मेहनत करत असतात त्यांच्या जीवनातील ही बोर्डाची पहिली परीक्षा असते परीक्षेला समोर जाताना त्यांचा उत्साह आत्मविश्वास वाढावा परीक्षेचा ताण कमी व्हावा त्यांनी परीक्षेला मनमोकळेपणाने सामोरे जावे या उद्देशाने विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणारा हा उपक्रम ग्रामपंचायतीच्या वतीने पहिल्यांदा च राबविण्यात आला.याकामी माजी सरपंच पद्माकर (आण्णा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, नितिन लक्ष्मणराव पाटील यांनी पुढाकार घेतला असून, यावेळी के एन शाळेचे मुख्याध्यापक सर जि प शाळा  यांचे मुख्याध्यापक जाधव सर सावित्रीबाई फुले प्रशालेच्या मुख्याध्यापिका ठाकूर मॅडम तंटामुक्ती चे अध्यक्ष .
नामदेव माकोडे, दादा शेळके, गणेश महाजन, सुरेश महाजन,अवधूत पाटील, गायत्री काँम्प्युटर्सचे संचालक अमोलसिंह चंदेल, जनार्धन महाजन, भैरवनाथ माकोडे, राजेंद्र गुरव, राजपाल देशमुख, सुरेश सत्वधर, मोहन ठोंबरे आदिची उपस्थिती होती.  पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात राबवलेल्या या उपक्रमामुळे परिक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थी वर्गात उत्साह संचारल्याचे चित्र पहावयास मिळाले.

Post a Comment

0 Comments

|