Header Ads Widget


महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आझाद मैदान मुंबई आंदोलन विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांचे समर्थन...


मुंबई/बुलेटिन

आज दिनांक 2 मार्च 2023
दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी राज्य शासनाच्या विधानसभा कामकाजास सुरुवात होत आहे. या अधिवेशन काळात बजेटमध्ये चर्चा होऊन आपल्या सर्व मागण्या सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महिला व बाल विकास मंत्री यांनी या आधी 12 जानेवारी 2023 रोजी दिले आहे. राज्य शासनाकडून भरघोस मानधन वाढ, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, नवीन व अद्ययावत मोबाईल, सेविका व मुख्यासेविका भरती प्रक्रियेत वयाची आणि शिक्षणाची सुट, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन, ग्रॅज्युटी, आजापणाची रजा, सेवा समाप्तीचा लाभ आणि इतर अन्य महत्त्वाच्या व प्रमुख मागण्यांच्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र भरातून अंगणवाडी कर्मचारी हे आझाद मैदान मुंबई येथे 2 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र भरातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मागण्या मान्य होईपर्यंत सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकजूट राहून संघटनेच्या सोबत ठाम पने उभे आहेत. संघटनेने केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.
मानधन वाढ ही निश्चित होणार असून, मात्र संघटनेचे ध्येय फक्त मानधन वाढ नसून संघटनेच्या इतर मागण्याही मान्य झाल्या पाहिजेत याकडेही संघटनेचा भर आहे, दिनांक 9 मार्च 2023 रोजी राज्याचे बजेट जाहीर करण्यात येणार आहे. त्यात आपल्या जास्तीत जास्त मागण्या मान्य होतील या आशेने आंदोलनात सहभागी झाले आहेत.सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनासाठी येण्या जाण्याचा वेळ, पैसा आणि दिवस यांचा विचार न करता आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण ताकतीने आझाद मैदानात उतरले आहेत, आणि संघटनेच्या न्याय व हक्कासाठी संघटनेसोबत तन मन धनाने लढत आहेत, यावेळी शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी समर्थन दिले, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे नेतृत्व माया परमेश्वर, शुभांगी पालशेतकर, युवराज पी. बैसाणे, रामकृष्ण बी. पाटील, दत्तात्रय जगताप, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे, तेजश्री गायकवाड, नयना मराठे, मीनाक्षी चौधरी, अरुणा आठवले, अश्विनी सुर्वे, विमल तीसकर, वनिता देशमुख, शकुंतला चौधरी,  आशा मगर, भारती घाटे, वसुधा मराठे, शोभा हावाळ, पवित्रा पवार, सर्व संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|