प्रतिनीधी/बिलाल कुरेशी
कळंब उपविभागिय पोलीस कार्यालय येथे आय. जी. श्री .मल्लिकार्जुन प्रसन्ना हे आले असता व्हाईस ऑफ मीडिया कळंब च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी व्हाईस आँफ मिडिया कळंब तीस मिनिटे वेळ दिला व व्हाईस आँफ मिडिया विविध विषयावर चर्चा करण्यात आली व मार्गदर्शन केले.
सविस्तर वृत्त असे की,
संभाजीनगर परिक्षेञाचे आय. जी. मल्लीकार्जुन प्रसन्ना हे दि १ मार्च रोजी कळंब येथील उपविभागिय पोलिस कार्यालयामध्ये आले असता व्हाईस आँफ मिडिया कळंब तालुका या संघटनेच्या वतिने आय. जी मल्लीकार्जुन प्रसन्ना व धाराशिव जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी व्हाईस आँफ मिडियाच्या सर्व पदाधिकारी व सदस्याशी संवाद साधला व संघटने विषयी माहीती घेतली यावेळी व्हाईस आँफ मिडीयाच्या पदाधिकारी यांनी या संघटनेचे कार्य व माहीती सांगीतली असता,श्री. प्रसन्ना यांनी या संघटनेसाठी शुभेच्छा दिल्या व पञकारांनी उपविभागिय पोलिस अधिकारी एम. रमेश यांच्या कार्याविषयी माहीती सांगीतली असता प्रसन्ना यांनी समाधान व्यक्त केले यावेळी व्हाईस आँफ मिडियाचे राज्याचे जिल्हयाचे व कळंब तालुक्याचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
0 Comments