उस्मानाबाद!Usamanabad/LivenationNews
प्रतिनिधि/बिलाल कुरेशी
शरदचंद्र महाविद्यालय शिराढोण यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर मौजे पिंपरी(शि) येथे युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास ही संकल्पना घेऊन दिनांक 01.02.2023 ते 07.02.2023 दरम्यान संपन्न झाले. या समारोप समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साजेद चाऊस होते प्रमुख पाहुणे श्री. शिंदे एस जी, डॉ. शेख ए आय होते. आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होते असे डॉ. शेख ए आय म्हणाले. राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना डॉ. चाऊस साजेद यांनी म्हटले की सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात.
विशेषत: शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात. शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढताना दिसून येते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना कार्यक्रमाधिकारी डॉ. सय्यद अमर यांनी सात दिवसांमध्ये केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिरमाळे एम बी व आभार डॉ. घोलप के जी यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व स्वयंसेवक उपस्थित होते.
0 Comments