Header Ads Widget


कल्पना बनली सहाय्यक अभियंता! आई-वडिलांचे स्वप्न केले साकार...

कळंब- आपली उन्नती, प्रगती करायची असेल, प्रतिष्ठितपणे जगायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. अहोरात्र काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या वडिलांना, परिवाराला बिकट परिस्थितीतून बाहेर काढायचंय ही खूणगाठ मनाशी बांधून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबपासून जवळच असलेल्या शेळका धानोरा येथील कल्पना बाळासाहेब शेळके या मुलीनं अत्यंत प्रतिकूल परिस्थिवर मात करीत जिद्दीनं शिक्षण घेतलं.. आणि महाट्रांस्कोच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन ती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीच्या सहाय्यक अभियंता श्रेणी 2 पदापर्यंत पोहचली. शेळका धानोरा या लहानशा गावखेड्यात राहूनही कल्पनाने उतुंग यश मिळवले आहे. 

बाळासाहेब व सीमा हे कल्पनाचे आईवडील दोन एकर कोरडवाहू असलेल्या शेतीत कष्ट करून कुटुंबाचा गाडा चालवतात.   मुलगा शुभम आणि मुलगी कल्पना या दोघांनाही ते जिद्दीने शिक्षण देत आहेत. मुलगा सिव्हिल इंजिअरिंगचे शिक्षण घेत आहे.मुलगी कल्पनाचे बारावीपर्यंतचे शिक्षण कळम्बच्या डीपीएम कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर बी ई पर्यंतचे शिक्षण तिने सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजी लोणावळा येथे घेतले. त्यानंतर तिने सहायक अभियंता पदासाठीच्या 170 जागासाठी  29 डिसेंम्बर 2022 ला महाट्रांस्कोने घेतलेल्या परीक्षेत कल्पनाने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. 25 हजार परीक्षार्थी उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती..या सगळ्या यशाचे श्रेय कल्पनाने आपल्या आईवडिलांना दिले आहे. कल्पनाने मिळवलेल्या यशाबद्दल शेळका धानोरा ग्रामपंचायतीने तिचा भव्य सत्कार केला. यावेळी ऍड. रवी शिंदे. जिल्हा परिषद सदस्य सुरेश कोरे, सौ महानंदा कोरे, सुवर्ण नागरी सहकारी  पतसंस्थाचे चेअमन हनुमंत बळीराम शेळके, ग्रापंचायत सदस्य सुवर्णा सुधाकर इंगळे, सरपंच दादा शिंदे.   उपसरपंच उमा शेळके. सदस्य
मनीषा शेळके. सदस्य सरुबाई इंगळे, सदस्य अनंत इंगळे, जिजाबाई कोरे सदस्य शालेय कमिटी
ज्योती विकास शेळके अध्यक्ष, प्रेमा भैरव टेळे उपाध्यक्ष
व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती.

शिवाय कल्पनाचे लातूर येथील काका नाना बिडवे व पत्रकार शिवाजी कांबळे यांनी कल्पनाचा सत्कार केला.

Post a Comment

0 Comments

|