Header Ads Widget


लाईव्ह नेशन न्यूज चे उपसंपादक श्री.सईद कुरेशी यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघात उपाध्यक्षपदी निवड..


नंदुरबार : समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी नेहमी तत्पर राहून लढणारा पत्रकारांचा बहुउद्देशीय संघ 
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यांचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संतोष निकम व राष्ट्रीय महासचिव श्री.रमेश देसाई यांच्या आदेशानुसार व नंदुरबार जिल्हाध्यक्ष श्री. योगेश्वर बुवा यांच्या नेतृत्वखाली नूतन कार्यकरणी जाहीर करण्यात आली असून, पत्रकार क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असणारे श्री.सईद कुरेशी यांचे पत्रकारिता क्षेत्रातील व समाजसेवा यांचे उत्कृष्ट कामाचे दखल घेऊन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार  संघात नंदुरबार जिल्हा उपाध्यक्षपदी सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली. श्री. सईद कुरेशी हे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघामध्ये मागील दोन वर्षापासून  जिल्हा कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत होते. मागील दोन वर्षांमध्ये त्यांनी संघाचे आदेशांचे पालन करून अनेक पत्रकार बांधवांना व समाजसेवकांना संघामध्ये जोडलेले आहे .


नवीन पत्रकार बंधू यांना या क्षेत्रामध्ये योग्य  मार्गदर्शन करुन, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची विचारधारा संपूर्ण जिल्हयातील तळागाळात असलेल्या पत्रकारांचे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही असो ते सोडवण्यासाठी नेहमी संघासोबत तत्पर राहून, सर्व शासकीय -निमशासकीय विभागाशी संपर्क किंवा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष भेट देऊन  उद्भवणाऱ्या प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात व राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व त्यांचेच असलेल्या 57 विंगला नेहमी वरिष्ठांचे आदेशाखाली संघ वाढविण्यासाठी प्रयत्नशील असतात. 

श्री.सईद कुरेशी यांना विविध क्षेत्रातून, समाजसेवक व पत्रकार बांधवांकडून प्रत्त्यक्ष/अप्रत्यक्ष सोशिअल मीडिया द्वारे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे..

Post a Comment

0 Comments

|