Header Ads Widget


कुलदैवत आई देवमोगरा माता परिसर स्वच्छ अभियान संपन्न...


प्रतिनिधी /समीर पठाण
विसरवाडी, आदिवासी रूढि परम्परा जाणीव, जागृती संस्था विसरवाडी ता.नवापुर यांच्या हस्ते गुजरात राज्यातील सागबारा येथील आदिवासी समाजाची कुलदैवत आई देवमोगरा येथे मंदिर परिसर, समस्त कार्यकर्ते नी स्वत: झाडुच्या सहाय्याने स्वच्छ करुन जमा झालेला कचरा जाळुन विलेव्हाट लावले .या स्वच्छता अभियान राबविण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या संस्थेचे कार्यकर्ते निस्वार्थ स्वतः च्या घरुन शिदौरी घेवुन येतात आणि कुलदैवताला नेवैध देवुन भंडारा देतात ,या संस्थेने आता पावेतो. महाराष्ट्र ,गुजरात राज्यातील असंख्य मोठे- मोठे मंदिर परिसरात जमा असलेला कचरा गोळा करुन स्वच्छता अभियान राबविले आहेत.  ठिक-ठिकाणी  वनराई बंधारे बांधले पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे संस्था च्या विषेश कार्यामुळे त्यांनी आपले नावलौकीक केले आहेत.आदिवासी समाजाची रूढी परम्परा जागृत करण्याचे काम या संस्थेच्या वतीने सुरु आहे. तसेच प्रत्येक गावात आदिवासी रुढी परम्परा जाणीव जागृती संस्थे माफँत प्रत्येक गावात 21 सदस्यांची नेमनुक कार्य सुरू आहे ,देवमोगरा मंदिर परिसर स्वच्छता अभियान कार्यक्रमात अध्यक्ष ईश्वर गावीत, सत्यानंद गावीत, बाबुराव वसावे,विवेक वळवी,अशोक पाडवी ,जय गावीत, अनिल गावीत, देवजी गावीत, सुधाकर वसावे व कांतीलाल नाईक यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ...

Post a Comment

0 Comments

|