Header Ads Widget


शिवरायांची व्यवस्थापन कौशल्य अंगीकारल्यास जीवनात यश हमखास,युवकांनी स्टार्टअप चे तोरण बांधावे: प्रा.जगदीश गवळी

उस्मानाबाद!Usamanabad/LivenationNews 
 प्रतिनिधी /बिलाल कुरेशी

कळंब :शिवरायांनी स्वराज्य निर्मिती करत असताना पूर्व नियोजन आणि सूक्ष्म व्यवस्थापन केल्याशिवाय कोणतीही लढाई केली नाही. आजच्या युवकांनी आधुनिक गड लढविताना  त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा जीवनात अंगीकार केल्यास हमखास यश प्राप्त होइल , असे मत शिवव्याख्याते प्रा जगदीश गवळी यांनी व्यक्त केले. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात शिवजयंती निमित्त आयोजित  "छत्रपती शिवाजी महाराजांचे  व्यवस्थापन कौशल्य "या विषयावर ते बोलत होते.यावेळी प्रा. डॉ.मुकुंदराव गायकवाड , प्रा.डॉ.बी . व्हीं.मैंद, प्रा डॉ अनंत नरवडे, अरविंद शिंदे,प्रा.डॉ. संजय सावंत,प्रा.डॉ. नागनाथ अदाटे, प्रा. बाळासाहेब खोसे,प्रा तांबोळी,प्रा. शिंदे ,प्राध्यापिका डॉ वर्षा जाधवसरवदे, डॉ. मिनाक्षी जाधव,प्रा.शिनगारे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा गवळी म्हणाले की ,छत्रपती शिवरायांचे  स्वराज्य निर्मिती हे मिशन तर शोषणमुक्त रयत हे विजन  होते.शिवरायांनी केवळ ढाल तलवारीच्या जोरावरती लढाया केलेल्या नाहीत तर त्यांची बुद्धी चातुर्याची लढाई आपण समजून घेतली पाहिजे. निर्णय क्षमता,नेतृत्वगुण,सुयोग्य लोकांची निवड,व्यवस्थापनातील पुढाकार ,नाविन्यता, संघटन, नवनिर्मिती ,प्रोत्साहन यातून लोककल्याणकारी राज्याची निर्मिती  केली. अफजलखानाचा वध असो, शाहिस्तेखानाची बोटे कापणी असो किंवा आग्र्याहून सुटका असो या प्रत्येक लढाईत महाराजांनी अत्यंत कौशल्यपूर्ण नियोजन केले होते. कुटिल निती , गनिमी कावा हे त्यांच्या राजकर्य धुरंदरतेचे उदाहरण आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांनी स्टार्टअप चे तोरण बांधून आधुनिक  एखादा उद्योग धंदा निर्माण करावा . येणाऱ्या संकटाची तमा न बाळगता छत्रपती शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्याचा वापर केल्यास प्रत्येक युवक यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. शिवरायांना जातीच्या चौकटीत न अडकविता जातीपलीकडेचे शिवराय आपण समजून घेतले पाहिजेत असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सावंत सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार यांनी केले.या कार्यक्रमास विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|