Header Ads Widget


महाशिवरात्रीच्या निमित्ताने शेवाळी (दातर्ती) येथील ब्रह्मकुमारीज गीता पाठशाला यांच्यातर्फे विविध कार्यक्रम संपन्न...


साक्री !Sakri/ LivenationNews  
प्रतिनीधी/अकिल शहा 
साक्री तालुक्यातील शेवाळी(दातर्ती) दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ शनिवारी रोजी महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गावात सर्वप्रथम सकाळी ठीक सात वाजता प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय पाठशाला येथून शोभायात्रा संपूर्ण गावात करण्यात आली, यावेळी एक दोन तीन चार शिवबाबा का जय जयकार अशा अनेक घोषणा देऊन व तसेच सामाजिक संदेश देऊन गावात भक्तीमय वातावरण निर्माण करण्यात आले त्यानंतर ठीक आठ वाजता पाठशालाच्या दीदी कविता दीदी यांच्या वतीने मुरली ज्ञान( शिवबाबा यांच्या जीवनावर आधारित मुरली व संदेश) ऐकविण्यात आले. वेळी उपस्थित गावातील सर्व नागरिकांनी क्रोध मुक्त, व्यसनमुक्त होण्याचा संकल्प केला, सकाळी ठीक साडेआठ वाजता शेवाळी(दा.)गावाच्या सरपंच सौ.चित्राताई प्रदीप नांद्रे यांच्या वतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी त्यांनी शिवबाबा यांच्या ८७ व्या वर्षानिमित्ताने शुभेच्छा दिल्या, शेवटी तुर्कस्तान देशातील भूकंप पीडित नागरिकांसाठी प्रार्थना व मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय पाठशाला च्या कविता दीदी, शेवाळी च्या सरपंच सौ.चित्राताई नांद्रे, पोलीस पाटील धनाजी साळुंखे, प्रभाकर साळुंखे, सुरेश साळुंखे, गबाजी साळुंखे ,विजय साळुंखे, ग्रा. पं.सदस्या सुरेखा साळुंखे, दिलीप साळुंखे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|