उस्मानाबाद!Usmanabad /LivenationNews
प्रतिनिधी/बिलाल कुरेशी
व्यथा, वेदना, मानवी मनातील सुप्त इच्छा- आकांक्षा व्यक्त करण्याचे उत्तम साधन म्हणजे कविता होय. मानवी जीवन सुखकर करण्यामध्ये कवितेचा मोठा वाटा आहे. माणसाला माणूस पण शिकवण्याचे काम कविता करते.असे त्यांनी शरदचंद्र महाविद्यालयांमध्ये इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या काव्यवाचन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. फारूक तांबोळी यांनी म्हटले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साजेद चाऊस हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.काझी झेड.ए. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गंभीरे पि.यू यांनी केले. कार्यक्रम मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी बहारदार काव्य वाचन केलेले दिसून येते.
0 Comments