Header Ads Widget


धाराशिव (उस्मानाबाद)जिल्ह्यातील पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेती करणाऱ्या व कृषि विषयक सातत्याने बातम्या देणाऱ्या पत्रकाराचा सन्मान....

प्रतिनिधी /बिलाल कुरेशी

       धाराशिव येथे स्वर्गीय पवनराजे साहेबांच्या 70 व्या जयंती निमित्त जिल्ह्यातील पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेती करणाऱ्या व कृषि विषयक सातत्याने बातम्या देणाऱ्या पत्रकाराचा सन्मान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर, श्री. नानासाहेब (काका) हरिश्चंद्र पाटील, श्री. संतोष सोमवंशी, श्री. संजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

     याप्रसंगी 1. धाराशिव जिल्ह्यात राजमा पीकाची सर्वप्रथम पेरणी करणारे शेतकरी श्री. काकासाहेब मोरे, 2. जिल्ह्यात सर्वप्रथम तुती लागवड करणारे शेतकरी श्री. राजेंद्र इदगे, 3. जिल्ह्यात सर्वप्रथम ड्रॅगन फ्रुटची लागवड करणारे शेतकरी श्री. नितीन सावंत, 4. जिल्ह्यात सर्वप्रथम स्ट्रॉबेरीची लागवड करणारे शेतकरी श्री. सचिन सुर्यवंशी, 5. कृषी क्षेत्राविषयी सातत्याने बातम्या, लेख लिहीणारे पत्रकार श्री. बालाजी आडसुळ, 6. कंत्राटी पध्दतीने शेती घेवुन सेंद्रीय शेती करणाऱ्या श्रीमती निर्मला मोरे यांना सन्मान पत्र, स्मृतिचिन्ह, शाल आदी देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रभाकर चोराखळीकर यांनी केले प्रस्ताविक व आभार श्री. गणेश भाऊ शिंदे यांनी केले.
    यावेळी युवासेना श्री. अक्षय ढोबळे, माजी गटनेते सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, राणा बनसोडे, राजु वाघमारे, काकासाहेब शिनगारे, समीर पठाण, छोटा साजिद, कलीम कुरेशी, पंकज पाटील,   पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|